Satara Politics News Gram Panchayat Election News 
सातारा

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीत दोन गट; सेनेच्या गोटात नाराजी

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत, तर शिवसेनेचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. तीन पॅनेलसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून, निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पॅनेल प्रमुखांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याची चर्चा रंगली आहे. 

ग्रामपंचायतीत सहा वॉर्डमध्ये 17 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सद्यःस्थितीत तीन पॅनेल पडली असून, अपक्ष उमेदवारांनीही जोर लावलेला आहे. निवडणुकीत तिरंगी लढत असली, तरी कोणत्याही पॅनेलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले नाहीत. महाविकास आघाडीचे सह्याद्री उंब्रज विकास महाआघाडी पॅनेल असून, त्यांनी 17 जागांसाठी केवळ 14 उमेदवार उभे केले असून, वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उमेदवार उभा केलेला नाही, तर भाजपचे श्री भैरवनाथ ग्रामविकास आघाडी पॅनेल असून, त्यांनीही 17 जागांसाठी केवळ 14 उमेदवार उभे केले आहेत. वॉर्ड क्रमांक सहामध्ये या पॅनेलने एकही उमेदवार उभा केला नाही, तर "राष्ट्रवादी'तील उमेदवारी धुसफुसीमुळे तिसरे पॅनेल श्री भैरवनाथ जनविकास परिवर्तन पॅनेल पडले असून, त्यांनी केवळ सहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या पॅनेलने वॉर्ड क्रमांक पाच व सहामध्ये उमेदवार उभे केले आहेत, तर अपक्षांचे भाव वधारलेला असून, आठ अपक्ष उमेदवार रिंगणात उभे आहेत. अनेक वॉर्डांत अपक्ष उमेदवार हे तीनही पॅनेल प्रमुखांची डोकेदुखी ठरू पाहात आहेत. 

उंब्रज ग्रामपंचायतीसाठी 17 उमेदवारांसाठी भाजप व महाविकास आघाडीने स्थापन केलेल्या पॅनेलचे प्रत्येकी 14 उमेदवार उभे असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पाच आणि सहा या वॉर्डांत या दोन्ही पॅनेलचा राजकीय पैरा झाला असल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी देण्यावरून दोन गट पडले असून, त्यांनी पाच आणि सहा वॉर्डमध्ये एकूण सहा उमेदवार दिले आहेत, तर शिवसेनेने महाविकास आघाडीतून एक उमेदवार दिलेला होता; परंतु राजकीय कुरघोडीमुळे माघार घेणे भाग पडले. यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजीचा सुरू असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. यामुळे वॉर्ड क्रमांक सहामध्ये शिवसेनेचे भूमिका निर्णायक ठरणार आहे. 

भावकी, जिरवाजिरवीमुळे अनेक इच्छुक! 

अनेक वॉर्डांत राजकीय मक्‍तेदारी, भावकीचे वर्चस्व, जिरवाजिरवी यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही. यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करून शह देऊन आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या वेळची निवडणूक रंगतदार होणार असून, उंब्रजमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चकचकीत पर्यावरण अहवाल नको, प्रदूषणमुक्त व राहण्यायोग्य शहर करण्यावर भर द्या !

Marathi News Live : मद्यधुंद व्यक्तीने फोडल्या ५ एसटी बसेसच्या काचा, ८० हजार रुपयांचे नुकसान, गुन्हा दाखल

Degloor News : हावरगा येथील शेतातील गोठ्यास भीषण आग; जनावरे भाजली, वैरण व शेतीसाहित्य जळून खाक

Banana Cultivation : निमगावातील शेतकऱ्यांचा केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग; १२ एकरांवरील बागांना घड, सात महिन्यांत उत्पादनाला सुरुवात

DA hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! महागाई भत्ता वाढला, सात महिन्यांची थकबाकीही मिळणार

SCROLL FOR NEXT