Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale esakal
सातारा

Satara Politics : 'या' मुद्द्यांवरुन साताऱ्याचं राजकारण पेटणार; दोन्‍ही राजेंचा एल्‍गार

पालिकेकडून घरपट्टीच्या बजावलेल्‍या नोटिसांवरून सर्वसामान्‍यांमध्‍ये संभ्रम आहे.

सकाळ डिजिटल टीम

सातारा विकास आघाडीवर टीका करत नागरिकांमध्ये संभ्रम तयार करण्‍यात येत आहे.

सातारा : सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना पालिकेने बजावलेल्‍या घरपट्टी वसुलीच्‍या नोटिसांबाबत नागरिकांत संभ्रम असून, त्‍याविषयी ‘सकाळ’ने सविस्‍तर वृत्त प्रसिद्ध केले होते. सातारकरांच्‍या द्दष्‍टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेत जाऊन केलेल्‍या चर्चेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना घरपट्टीतील त्रुटी दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच अनुषंगाने उदयनराजेंनीही कॅम्‍प घेण्‍याच्‍या तसेच कोणावरही घरपट्टी वसुलीबाबत बळजबरी न करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास केल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

पालिकेकडून घरपट्टीच्या बजावलेल्‍या नोटिसांवरून सर्वसामान्‍यांमध्‍ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्‍यासाठी आज शिवेंद्रसिंहराजेंनीशहरातील शेकडो नागरिकांसह पालिकेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्‍याशी चर्चा केली. यावेळी त्‍यांनी घरपट्टी नोटिसांतील त्रुटी दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनीही भूमिका मांडली.

त्‍यांनी, घरपट्टीच्या नोटिसा आणि ती आकारणीच्‍या मुद्द्यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नागरिकांनी या अनुषंगाने आमच्‍याकडे संपर्क करत तोडगा काढण्‍याची मागणी केली होती. यानुसार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हद्दवाढ भागात कॅम्प लावण्‍याच्‍या तसेच कर भरणासाठी बळजबरी न करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

शहरातील शेकडो नागरिकांसह पालिकेत मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्‍याशी चर्चा केली. यावेळी त्‍यांनी घरपट्टी नोटिसांतील त्रुटी दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. याच अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले यांनीही भूमिका मांडली. त्‍यांनी, घरपट्टीच्या नोटिसा आणि ती आकारणीच्‍या मुद्द्यावर नागरिकांमध्ये संभ्रम आहे. नागरिकांनी या अनुषंगाने आमच्‍याकडे संपर्क करत तोडगा काढण्‍याची मागणी केली होती. यानुसार पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना हद्दवाढ भागात कॅम्प लावण्‍याच्‍या तसेच कर भरणासाठी बळजबरी न करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनास दिल्‍याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

विभागवार शिबिरे घ्‍या : शिवेंद्रसिंहराजे

सातारा शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना देण्‍यात आलेल्‍या घरपट्टीच्‍या नोटिसा चुकीच्‍या पद्धतीने करण्‍यात आल्‍याच्‍या आक्षेपांची दखल घेत त्‍याबाबत शंका, प्रश्‍‍नांचे निराकरण करण्‍यासाठी विभागावर शिबिरे घेण्‍याच्‍या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांना केल्‍या होत्‍या. यानुसार अशी विभागवार शिबिरे घेण्‍याची कार्यवाही करण्‍याबरोबरच विस्तारित भागातील नागरिकांना आवश्‍‍यक त्‍या सुविधा तत्‍काळ पुरविण्‍याचे आश्‍वासन यावेळी श्री. बापट यांनी उपस्‍थितांसह शिवेंद्रसिंहराजेंना दिले.

यावेळी ‘नविआ’चे माजी नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्‍हाण, अशोक मोने, अमोल मोहिते, जयवंत भोसले, शाहूपुरी आघाडीचे भारत भोसले, अक्षय जाधव, आशुतोष चव्‍हाण यांच्‍यासह इतर पदाधिकारी तसेच शहरासह विस्तारित भागातील नागरिक मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘प्राथमिक सुविधा न पुरवता पालिकेने अन्‍याय केल्‍याची भावना हद्दवाढ भागातील नागरिकांच्‍यात निर्माण झाली आहे. त्‍यातच शहरासह विस्तारित भागातील नागरिकांना आता घरपट्टीच्या नोटिसा पाठविण्‍यात आल्‍या आहेत.

यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी, घरपट्टीबाबत शंका, प्रश्‍‍न दूर करण्‍यासाठी विभागवार शिबिरे आयोजित करण्‍याचे तसेच त्‍यातील सूचना, त्रुटी जाणून नागरिकांना बिल दुरुस्‍ती करून देण्‍याची कार्यवाही करण्‍याची मागणी केली. यानुसार कार्यवाही न करता घरपट्टी वसूल करू नये. आम्‍ही तशी घरपट्टी भरणार नाही व त्‍याविरोधात आंदोलन छेडण्‍याचा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला. यानुसार श्री. बापट यांनी, नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्‍यासाठी विभागवार घरपट्टीबाबत सुनावणी घेण्‍याचे आश्‍‍वासन दिले.

लोकांच्या शंकांचे निरसन करा : उदयनराजे

सातारा विकास आघाडीवर टीका करत नागरिकांमध्ये संभ्रम तयार करण्‍यात येत आहे. आम्‍ही अशा आरोपांना भीक घालत नसल्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उदयनराजे म्हणाले, ‘‘घरपट्टीच्या नोटिसांबाबत नागरिकांच्‍यात संभ्रम आहे. त्‍याबाबत तोडगा काढण्‍याची नागरिकांची मागणी होती. त्यानुसार हद्दवाढ भागात कॅम्प लावून घरपट्टीबाबत लोकांच्या शंकांचे निरसन करा, तसेच कर भरण्यासाठी कोणालाही बळजबरी करू नका, असा सूचना पालिका मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत.’’ विविध योजना, त्‍यातून मिळालेला निधी, त्‍यातून मार्गी लागलेल्‍या विकासकामांची माहिती देण्‍यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT