Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

कुरणेश्‍वरात 350 दुर्मिळ जातींच्या झाडांचे सवर्धन; सयाजी शिंदेंकडून पर्यावरणप्रेमींचे कौतुक

प्रशांत घाडगे

सातारा : कुरणेश्‍वर येथील गणपती मंदिर परिसरातील दुर्मिळ झाडांच्या प्रकल्पाला अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांनी नुकतीच भेट दिली. या ठिकाणी 350 हून जातींच्या झाडांचे सवर्धन केल्याने त्यांनी वृक्ष समितीचे कौतुक केले. 

यावेळी अशोक गोडबोले, देवस्थानचे अध्यक्ष शंकरशास्त्री दामले, डॉ. अच्युत गोडबोले, अभय गोडबोले व वृक्ष समितीतील सदस्यांनी सयाजी शिंदे यांचा सत्कार केला. कुरणेश्‍वर येथे गेल्या पाच वर्षांपासून वृक्ष प्रकल्प साकारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध जातींची 350 दुर्मिळ झाडे व इतर एक हजारांहून अधिक झाडांनी परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

या ठिकाणी विविध झाडांचे संगोपन, पर्यावरणाचे महत्त्व आदींविषयी श्री. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी परिसरातील नक्षत्रबन व इतर भागास भेट देऊन परिसराची माहिती घेतली. यावेळी अभय फडतरे, सुनील जाधव, श्रीकांत भणगे, श्री. करंबेळकर, श्री. ताटके, श्री. खांडेकर, श्री. दीक्षित व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: राजगडाच्या वाटेवर दुर्दैवी दुर्घटना; पाबे घाटात मिनी बस दरीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू...

Latest Marathi News Update : श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज वाशीम जिल्ह्यात दुसरा दिवस

IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

Kolhapur Crime: काेल्हापुरातील पाडळकर मार्केटसमोरील व्हिडिओ पार्लरवर छापा; माजी नगरसेवकावर गुन्हा, साडेचार लाखांची एकवीस मशीन ताब्यात

TET 2026 Paper Leak : त्यांच्याकडे आमदार-खासदार फोडण्याचे कौशल्य; टीईटी पेपरफुटी प्रकरणानंतर अभिजित दीपकेंची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT