Well system
सातारा

पठाण कुटुंबीयांनी 300 रुपयात खोदली विहीर; 18 फुटांवर लागलं पाणी

इम्रान शेख

रहिमतपूर (जि. सातारा) : लॉकडाउनच्या (lockdown) काळात घरीच राहून मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत येथील पठाण कुटुंबीयांनी 15 ते 16 दिवसांत 23 फूट खोल विहीर (well) खोदली. त्यासाठी त्यांना फक्त 300 रुपये खर्च आला. कोरोना काळात कामधंदे बंद असल्याने सर्वसामान्यांची मानसिकता ढासळत असताना पठाण कुटुंबीयांनी निवडलेला मार्ग त्यांना नक्कीच ऊर्जा देईल. (satara-positive-story-pathan-family-digged-well-rahimatpur)

कोरोना संकट सर्वत्र घोंगावत असताना बाधितांचा संख्या कमी करण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले आहे. हातावरचे पोट असल्याने पाहिल्यापासूनच कष्ट करण्याची सवय असलेले जावेद पठाण हे वाहन दुरुस्तीचे काम करतात, तर महिबूब पठाण हे दिवसभर कुल्फी विक्रीचा व्यवसाय, पहाटे व रात्री मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु; लॉकडाउनमुळे पूर्ण व्यवसाय ठप्प असल्याने घरी बसून दिवस काढण्यापेक्षा मिळालेला वेळ ही संधी समजून पठाण कुटुंबीयांनी पाणीटंचाईचा प्रश्न दूर करण्यासाठी घरामागील जागेत विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.

ईदच्या (Ramzan Eid) दुसऱ्या दिवशी ता. 15 मे रोजी सकाळी आठ वाजता जावेद, मेहबूब, शाफिक पठाण हे बंधू व फैजान पठाण यांनी विहीर खोदण्यास सुरवात केली. घरातील इतरही मंडळी जमेल त्या पद्धतीने मदत करतच होते. ही विहीर काढण्यासाठी त्यांनी फक्त घरगुती वस्तूंचा वापर केला. विहीर खोल गेल्यानंतर माती बाहेर काढण्यासाठी दुचाकीचा वापर करून माती बाहेर काढण्यात आली. या संपूर्ण विहिरीसाठी फक्त माती काढण्यासाठी दुचाकीला तीन लिटर पेट्रोल लागले आणि तोच खर्च पूर्ण विहीर काढण्यासाठी झाला असल्याचे पठाण कुटुंबिय सांगत आहेत.

घरापासून ओढा जवळ असल्याने 18 फुटांवर पाणी लागले. हे पाणी टिकून राहावे यासाठी त्यांनी आणखी 5 फूट विहीर खोल केली. जवळपास 23 फूट खोल व 7 फूट रुंद अशी विहीर पठाण कुटुंबीयांनी फक्त 15 ते 16 दिवसांत पूर्ण केली. या विहिरीमध्ये सध्या जवळपास चार फूट पाणी आहे. विहिरीतील थंडगार पाणी पाहून भर उन्हात केलेल्या कष्टचे फळ मिळालेच, पण आयुष्यभराचा पाण्याचा प्रश्नही मिटल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT