Koyna Dam esakal
सातारा

सातारा : कोयना धरणात केवळ १० जुलैपर्यंत उपलब्ध असणारा पाणीसाठा पुरणार

सिंचन, वीजनिर्मितीवर परिणाम शक्य

विजय लाड

कोयनानगर : मॉन्सून लांबल्याने कोयना धरणात पाण्याचा ठणठणाट आहे. धरणात केवळ १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणात उपलब्ध पाणीसाठ्यावर पश्चिमेकडील वीजप्रकल्प, तर पूर्वेकडील शेती सिंचन चालू आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाला असूनही शेती सिंचनासाठी साठा आरक्षित असल्याने कोयना जलविद्युत प्रकल्पातून कमी क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी धरणातून अत्यल्प पाणीसाठा वापरला जात आहे. कोयना धरणात केवळ १० जुलैपर्यंत उपलब्ध असणारा पाणीसाठा पुरणार आहे.

कोयनची १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता आहे. धरणात १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध अत्यल्प पाणीसाठ्यावर पूर्वेकडील सिंचन, तर पश्चिमेकडील वीजप्रकल्प कार्यान्वित आहेत. पूर्वेकडील शेती सिंचनासाठी धरणातून दोन हजार १०० क्युसेक, तर पश्चिमेकडील वीज प्रकल्पाला दररोज ०.२ टीएमसी पाणीसाठा सोडला आहे. धरणातील पाणीसाठा ओहोटीकडे आहे. त्यामुळे पाण्याचा खडखडाट जाणवत आहे. धरणातील उर्वरित पाणीसाठा शेती सिंचनासाठी आरक्षित असल्याने वीजनिर्मितीवरही मर्यादा येऊ लागल्या आहेत. पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी पाण्याचा वापर कमी झाला आहे.

पश्चिमेकडील वीज प्रकल्पातून कमी क्षमतेने वीजनिर्मिती करण्यात येत आहे. एक जूनच्या नवीन जल वर्षापासून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी २.८ टीएमसी पाण्याचा वापर महानिर्मिती कंपनीने केला आहे, तर पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी २.४४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. ०.५१ टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी कमी वापरण्यात आला आहे. धरणातील पाणीसाठा १० जुलैपर्यंत पुरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT