प्रतापगड sakal
सातारा

Satara : प्रतापगड- ‘किसन वीर’चा करार संपुष्टात

दोन्ही संचालक मंडळांची सामंजस्य भूमिका

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन २०१२-१३ पासून केलेला भागीदारी करार आज नऊ वर्षांच्या कालखंडानंतर सामंजस्याने संपुष्टात आणला. त्यामुळे प्रतापगड कारखाना आता किसन वीरच्या व्यवस्थापनाकडून मुक्त करण्यात आल्याने प्रतापगड पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आहे.

प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन २०१२-१३ रोजी भागीदारी करार करून प्रतापगड कारखाना सहकारात टिकविण्याचे काम केले होते. शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना १२ महिने काम मिळावे, वेळेवर पगार मिळावा, या हेतूने हा करार त्यावेळच्या संचालक मंडळाने केला होता;

परंतु कारखान्याचे माजी अध्यक्ष मदन भोसले यांच्या कालखंडातील गेल्या पाच वर्षांत प्रतापगडचे तीन गळीत हंगाम किसन वीर व्यवस्थापनाने बंद ठेवले. यामुळे शेतकरी, कामगारांसह कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कारखाना चालविण्यास देण्याचा मूळ हेतूचे साध्य होत नसल्यामुळे हा करार मोडण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. त्याबाबत साखर आयुक्तांकडे लवादही दाखल केला होता.

दरम्यान, किसन वीरची निवडणूक लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी निवडणुकीवेळी सत्तांतर करा. जावळीचा प्रतापगड जावळीकरांच्या स्वाधीन करण्याचा शब्दही दिला होता. त्यानुसार सत्तांतर झाल्याने किसन वीरचे अध्यक्ष मकरंद पाटील, तसेच संचालक नितीन पाटील यांनी प्रतापगडच्या व्यवस्थापनास करार संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करून करार संपुष्टात आणला.

या वेळी मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीरचे संचालक, तसेच प्रतापगड कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे, उपाध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, दादा फरांदे, नाना पवार, आनंदराव मोहिते व संचालक मंडळ उपस्थित होते. किसन वीर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल प्रतापगडच्या संचालकांनी आभारही मानले.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख भूमिकेमुळे कारखाना पुन्हा एकदा जावळीकरांच्या स्वाधीन झाला आहे. प्रतापगड कारखाना शेतकरी- सभासद- कामगार यांच्यासाठी लवकरच नव्या जोमाने कार्यरत होत आहे.

सौरभ शिंदे, अध्यक्ष, प्रतापगड कारखाना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Billion Dollar Build : करोडपती व्हायचंय? AI वापरुन आठ दिवसांत बनवा कंपनी अन् मिळवा ९ कोटींचं बक्षीस, काय आहे स्पर्धा? जाणून घ्या

निरागस चिमुकल्यांचे फोटो, रक्ताने माखलेल्या बॅग अन् शूज; विमानात १६५ सीटवर हल्ल्याच्या आठवणी, इराणने अमेरिकेला दाखवला आरसा

Snake Found in Bike : भयंकर! दुचाकीच्या सीटखाली फणा काढून बसला होता 6 फुटी काळा नाग; रात्रीच्या वेळी घरच्यांची उडाली झोप, पुढे काय झालं?

Road Accident in Sinnar : जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना काळाचा घाला! सिन्नरमध्ये भीषण अपघातात चार जागीच ठार, दोघे जखमी

Success Story: मातीच्या कष्टातून वर्दीपर्यंतचा प्रवास; शेतमजुराच्या लेकरांनी नाव कमावलं... बहिण-भाऊ दोघेही बनले पोलिस

SCROLL FOR NEXT