Satara: Railway station
Satara: Railway station sakal
सातारा

सातारा : रेल्वे स्थानक महिलांसाठी असुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : सातारा रेल्वे स्थानकात (क्षेत्रमाहुली) पोलिस चौकी, स्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही यंत्रणा आणि स्वतंत्र महिला प्रतीक्षालयाचा अभाव असल्याने प्रामुख्याने महिला प्रवासी वर्ग असुरक्षित आहे. या गंभीर समस्यांसह स्थानकात अनेक अडचणी आ वासून उभ्या आहेत.

सातारा शहरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या सातारा रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे दोन ते अडीच हजारांवर प्रवासी ये-जा करतात. रेल्वे स्थानकात साताऱ्यातील प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पूर्वी चांगल्या पद्धतीने सुरू असलेली बस वाहतूक गेली कित्येक वर्षे बंद आहे. त्यामुळे काही प्रवाशांना रिक्षासाठी इच्छितस्थळी रेल्वेने जाण्यासाठी जेवढे तिकीट असते, त्यापेक्षा जास्त पैसे साताऱ्यातून रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी रिक्षाला मोजावे लागतात. या पार्श्वभूमीवर बससेवाही पूर्ववत सुरू होणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत अगदी छोट्या छोट्या दुकानांत, हॉटेल आदी आस्थापनात गेले, तरी सुरक्षिततेच्या दृष्‍टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली पाहायला मिळते. मात्र, सातारा रेल्वे स्थानकात ही यंत्रणा अद्याप बसवली नसल्याने प्रामुख्याने महिला असुरक्षित आहेत. मुळात हे स्थानक क्षेत्रमाहुली गावापासून सुमारे ५०० ते ६०० मीटर दूर आहे. परिसरात वसाहत अत्यल्प आणि शिवार जादा आहे. अशा स्थितीत प्रामुख्याने प्रवासी महिला, लहान मुले, वृध्द प्रवाशांच्या सुरक्षिततेसह रेल्वेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने बसवणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्याचे ठिकाण असून येथे असलेल्या रेल्वे स्थानकात महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालयाचाही अभाव आहे. त्यामुळे प्रामुख्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या महिला, तसेच व्हीआयपी महिला वर्गाला गाडीच्या वेळेपूर्वी स्थानकात येऊन थांबण्याची गैरसोय होते. त्यांना स्थानकात येऊन तासन्‌ तास गाडीची वाट पाहणे गैरसोयीचे होते. त्यातूनही महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होतो. महिलांसाठी प्रसाधनगृहासह सुसज्ज असे प्रतीक्षालय उभारणे गरजेचे आहे.

रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवरील इमारत जीर्ण व धोकादायक झाली आहे. त्यातील सध्या‍ वापरात असलेले प्रसाधनगृह सोयीस्कर राहिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तेव्हा फलाट क्रमांक एकवर उत्तर आणि दक्षिण बाजूला नवीन दोन प्रसाधनगृहे उभारणे गरजेचे आहे. तसेच सध्‍या रेल्वे स्थानकात एकच ओव्हर ब्रीज असून, तातडीच्या वेळी नियोजित रेल्वे गाडी फलाट क्रमांक दोनवर घेतल्यास किंवा आल्यास प्रवाशांना फलाट क्रमांक दोनवर जाणे गैरसोयीचे ठरते. त्यासाठी फलाट एक व दोनला जोडणारा आणखी एक ओव्हर ब्रीज उभारणे गरजेचे आहे.

पोलिस तक्रारीसाठी ‘द्राविडी प्राणायाम’

सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास सध्‍या तक्रार वा फिर्याद दाखल करण्यासाठी प्रवाशांना सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्टेशनला जावे लागते. म्हणजे ‘द्राविडी प्राणायाम’ करावे लागते. हे गैरसोयीचे असल्याने सातारा रेल्वे स्थानकात स्वतंत्र पोलिस अधिकारी नियुक्त करून पोलिस चौकी सुरू करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT