कुकुडवाड : पाउस 
सातारा

बा विठ्ठला घरी थांबवलंस... पावसालाही धाडलंस...

सकाळ वृत्तसेवा

कुकुडवाड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील कुकुडवाड परिसरातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरवातीस मृग नक्षत्रात झालेल्या पावसाच्या ओलीवर काही प्रमाणावर पेरण्या उरकल्या होत्या. काही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. मागील तीन दिवसांपासून झालेल्या दमदार भीज पावसाने पेरणी केलेल्या पिकास जीवदान मिळालेलं आहे, तर राहिलेल्या शेतकऱ्यास पेरणी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 

कुकुडवाड परिसरातील वळई, पानवण, विरळी, चिलारवाडी, शेणवडी या गावांमध्ये जून महिन्यात सुरुवातीस झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओठी भरून जणू मातीशी झुगारचं खेळला होता. काही शेतातील पिके उगवून आली होती, तर काही पिके उगवतील, की नाही अशा परिस्थितीत होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता; पण मागील तीन- चार दिवस झालेल्या पावसाने शेतकरी संतुष्ट झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

हा पाऊस जरी पडला असला, तरी तरी उद्याच्या भविष्याची चिंता मात्र काहीशी कमी झालेली नाही. अद्यापही या परिसरातील ओढे, नाले, पाझर तलाव आणि विहिरी पूर्ण क्षमतेने भरल्या नसल्याने आणि यापुढे पावसाने पाठ फिरवली तर पिकास पाणी पुरणार का? असा प्रश्‍न आहे. 

मागील चार ते पाच वर्षांपासून लहरी हवामान, बेमोसमी पाऊस आणि सततचा दुष्काळ यामुळे येथील शेतकरी त्रासला आहे. यातच कोरोनाच्या महामारीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चांगलेच बिघडले आहे. यावर्षी मात्र खरिपाची जोरदार तयारी केलेली आहे. निसर्गाने अशीच चांगली साथ दिली तर शेतकऱ्यांची चिंता मिटेल, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT