Satara Rain sakal
सातारा

Satara Rain : तासाभराच्या पावसाने शेतकरी सुखावला;आरडगाव परिसरातील चित्र

पावसाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात व काल (रविवारी) सुमारे तासभर दमदार हजेरी लागवली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे

सकाळ वृत्तसेवा

आरडगाव/विठ्ठलवाडी : पावसाने अनेक दिवसांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात व काल (रविवारी) सुमारे तासभर दमदार हजेरी लागवली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, अद्यापही धरणे, ओढे - नाले कोरडे असल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

गेल्या वर्षीही पाऊस कमी झाल्याने या भागात यंदा पाण्याची मोठी ओरड आहे. जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही मोठा निर्माण झाला होता. या भागातील तांबवे धरण, लेंडीचे धरण, सालपे घाटपायथ्याशी असलेले मळवी धरण, हिंगणगाव शेजारील बुरसुंडी धरण पाण्याविना अजूनही कोरडी आहेत. त्यामुळे कापडगाव, चांभारवाडी, आरडगाव, हिंगणगाव या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. सहा दिवसांतून १५- २० मिनिटेच पाणी येत असल्याने दूरवरून पाणी आणून लोकांचे कंबरडेच मोडले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सामान्यांना प्रतीक्षा असणाऱ्या पावसाने जून महिन्यात या परिसरात दमदार हजेरी लावली आहे. काल (रविवारी) सायंकाळी येथील सर्वच भागांत पावसाने सुमारे एक तास जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जून महिन्यात पडलेल्या दोन-चार पावसांमुळे विहिरीतील पाणीपातळी थोडीशी वाढणार आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती आता कमी होणार आहे. या जोरदार पावसामुळे शेतातील सऱ्या पूर्णपणे पाण्याने भरून गेल्या आहेत. शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींना सुरुवात होणार आहे. यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने या भागातील शेतकरी आनंदी आहे. अजूनही आजूबाजूची धरणे, ओढे, नाले कोरडे असल्याने भागातील शेतकरी व सामान्य जनता अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Schools Closed in India: देशात एक लाख प्राथमिक शाळा बंद; संसदेत गाजला मुद्दा, खरी परिस्थिती नेमकी काय आहे?

Quick Heal Story: दोनदा नापास... मोठी डिग्री नाही... 350 रुपयांच्या पगारावर काम करणाऱ्या पठ्ठ्याने उभी केली 800 कोटींची कंपनी

MHT CET Final Merit List 2026 आज जाहीर! CAP Round 1 Choice Filling सुरू; मेरिट लिस्ट कशी पाहाल? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Latest Live Updates Marathi : पंतप्रधानांनी कॅमेराचा नाही, हृदयाचा ॲगल बदण्याची गरज, प्रियंका गांधींची सरकारवर सडकून टीका

License Suspended: नगदवाडी-१४ मध्ये संचिता फुड्सवर अन्न व औषध प्रशासनाची धडक; कुल्फी उत्पादन परवाना तात्काळ निलंबित

SCROLL FOR NEXT