Isloation center 
सातारा

पावासाचा हाहाकार ; 29 काेराेनाबाधित कक्षात अडकले

संताेष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रजसह परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारासह क-हाड तालुक्यातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. शिवडे (ता. कराड) येथे उभारण्यात आलेल्या सहयोग विलगीकरण कक्षाच्या आवारात उत्तर मांड नदीचे पाणी शिरल्याने २९ कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात अडकले असून रुग्णांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. (satara-rain-update-water-logged-covid19-isolation-center-umbraj)

उंब्रजसह परिसराला बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. उत्तर मांड नदीकाठावरील शेतीसह घरे, विटभट्टीमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. शिवडे येथे रोटरी क्लब उंब्रज, ग्रामपंचायत उंब्रज, ग्रामपंचायत शिवडे याच्या माध्यमातून उभारण्यात सहयोग विलगीकरण कक्षाच्या आवारातही पाणी साठल्याने कक्षातील रुग्ण अडकले आहेत.

अचानक पावसाचे पाणी साठल्याने प्रशासनासह संयोजकांची तारांबळ उडाली होती. प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान पावसाचा जाेर आेसरु लागला असला तरी नदी काठच्या ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT