koyna dam 
सातारा

काेयना धरणातून आज 2100 क्यूसेक पाणी साेडणार

विजय लाड

काेयनानगर (जि. सातारा) : मुसळधार पावसाचा (heavy rain) जोर कायम असल्याने कोयना धरणाच्या (koyna dam) पायथा वीजगगृहातून आजपासून (शुक्रवार) पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. वीज निर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत (koyna river) सोडले जाणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने ई-सकाळला दिली. दरम्यान यामुळे कोयनेसह कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. (satara-rain-update-water-will-realeased-koyna--dam-breaking-news)

महाबळेश्वर, नवजा, कोयनेसह पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणात प्रतिसेकंद सरासरी ४१ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे आज सकाळी 11 वाजता कोयना धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीज निर्मिती करून पूर्वेकडे कोयना नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अगोदरच कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यातच आता पायथा वीजगृहातून पाणी सोडले जाणार असल्याने नदीकाठच्या लोकवस्ती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या योजनांबाबत आवश्यक त्या खबरदाऱ्या घ्याव्यात, असे आवाहन कोयना धरण व्यवस्थापनासह महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार म्हणाले सांगली पाटबंधारे विभागाचे दहा दिवसापूर्वी नदीतून मोठमोठ्या फळ्या काढण्याचे काम सुरु असल्याने नियमीतपणे सुरु असलेले हे पाणी बंद केले होते. पूर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून आरक्षित केलेला पाणीसाठा वापराविना संपून जावु नये व संभाव्य पुराच्या वेळी हे पाणी काढावे लागणार आहे. पूरा मध्ये हे पाणी विनाकारण सोडावे लागू नये म्हणुन हे पाणी सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर कोसळली वीज, थरारक दृष्य कॅमेरात कैद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT