शाळेचा पत्रा उडाला sakal
सातारा

सातारा : अवकाळी पावसाने अखेर तारळे विभागाला झोडपून काढले

वादळी पावसाचा तारळे भागात फटका

सकाळ वृत्तसेवा

तारळे : अवकाळी पावसाने अखेर तारळे विभागाला काही काळ झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या दमदार पावसाने वातावरण थंड झाले होते. मात्र, अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काल सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा वाहू लागला. त्यानंतर विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्याने तारळेत मुलांच्या शाळेचा पत्रा उडाला. त्यामुळे छताचे नुकसान झाले. कोंजवडे रस्त्यावर दोन ठिकाणी झाड पडले. स्थानिकांनी रस्त्यावर आलेल्या फांद्या तोडून मार्ग खुला केला.

आंबा चौकातील शाळेत एक झाड पडले. मात्र, नुकसान झाले नाही. धनगरवाडीनजीक एक झाड कोसळले. कोंजवडे गावात विजेचे खांब वाकले, तर विद्युत तारा तुटल्या. कालपासून तेथील वीज खंडित आहे. जगदाळवाडीनजीक तीन खांब पडले आहेत. त्यामुळे कडवे भाग अंधारात आहे. येथील बौद्ध वस्तीत पाटसुपे यांचे शेड उडाले. कोंजवडेत रमेश साळुंखे यांचेही पत्राशेड उडाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT