khatav 
सातारा

ऐतिहासिक गावात ऐतिहासिक तळ्याची दुरुस्ती

शशिकांत धुमाळ

औंध (जि. सातारा) : येथील ऐतिहासिक पझ्माळे तळ्याच्या भिंतीच्या कामाची जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

गेल्या वर्षी झालेल्या धुवाधार पावसात या ऐतिहासिक तळ्याची भिंत कोसळली होती. त्यामुळे रस्त्याशेजारील घरांना धोका निर्माण झाला होता. याबाबत गायत्रीदेवींनी तत्कालीन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन ऐतिहासिक तळ्याचे महत्त्व सांगत तळ्याच्या संरक्षण भिंतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. धार्मिक विधीच्या दृष्टीने तळ्याचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनीही 72 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यंदा निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरुवात झाली होती. मात्र, लॉकडाउनमुळे हे काम अडकले होते. महत्त्वाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नियमात दिलेल्या शिथिलतेमुळे हे काम गतीने सुरू आहे. गायत्रीदेवींनी या कामाची पाहणी केली. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या. 

या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शरद राजभोज, कार्यकारी अभियंता शंकर दराडे, उपअभियंता एस. ए. देसाई, शाखा अभियंता एस. बी. पवार, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, गणेश देशमुख, नवनाथ वलेकर, सचिन शिंदे, प्रदीप कणसे, प्रा. संजय निकम व कार्यकर्ते उपस्थित होते. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT