Satara 
सातारा

कचरा टाकणारा कळवा, हजार रुपये बक्षीस मिळवा, "या' ग्रामपंचायतींची नामी शक्कल

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी मंद्रुळकोळे व ढेबेवाडी ग्रामपंचायतींनी नामी शक्कल शोधली आहे. त्याअंतर्गत कचरा टाकणाऱ्याला दोन हजार रुपये दंड तर होणार आहेच, शिवाय संबंधित व्यक्ती कचरा टाकत असतानाचे छायाचित्र ग्रामपंचायतीला पाठवणाऱ्यासही एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याने नागरिकही ये-जा करताना कुणी दिसतोय का? यावर लक्ष ठेवून आहेत. 

ढेबेवाडी व मंद्रुळकोळे या दोन्ही ग्रामपंचायतींचे कार्यक्षेत्र एकमेकाला चिटकून आहे. ढेबेवाडी बाजारपेठेचा बराच भाग मंद्रुळकोळेच्या हद्दीत असल्याने विविध सुविधा व उपाययोजनांबाबत त्यांना एकत्र बसून नियोजन करावे लागत आहे. मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीने दीड वर्षापासून घंटागाडी सुरू केली असली तरी ढेबेवाडी ग्रामपंचायत मात्र त्याबाबत मागे राहिली आहे. त्यांना स्वतंत्र जागा व व्यवस्था नसल्याने आठवडा बाजार व गावात पडणारा कचरा सार्वजनिक ठिकाणी खड्डा खोदून टाकण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

अनेकजण उघड्यावर कचरा टाकत असून, गावच्या प्रवेशव्दारावर म्हणजे वांग नदीवरील पुलापर्यंत आता हे लोण पोचले आहे. चिकन सेंटरमधील दुर्गंधीयुक्त कचऱ्याचाही यात समावेश आहे. कचरा टाकणारे पहाटे किंवा रात्री-अपरात्रीही कचरा टाकून सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात आणत असल्याने मंद्रुळकोळे व ढेबेवाडी ग्रामपंचायतींनी नामी शक्कल शोधली आहे. त्याअंतर्गत कचरा टाकणाऱ्याला दोन हजार रुपये दंड तर होणार आहेच, शिवाय संबंधित व्यक्ती कचरा टाकत असतानाचे छायाचित्र ग्रामपंचायतीला पाठवणाऱ्यासही एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याने ये-जा करताना कुणी सापडतोय का? यावर नागरिकही लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.

मंद्रुळकोळेच्या हद्दीत ग्रामपंचायतीने त्याबाबत सूचना फलकही ठिकठिकाणी लावलेले असून, त्यावर छायाचित्र पाठवण्यासाठी सरपंच अमोल पाटील व ग्रामविकास अधिकारी संतोष घोडे यांचे मोबाईल क्रमांकही नमूद आहेत. छायाचित्र सुस्पष्ट असावे, अशी अट या बक्षीस योजनेत आहे. दरम्यान, ढेबेवाडी ग्रामपंचायतही सूचना फलकांबाबत कार्यवाही करत असून, ध्वनिक्षेपकांवरून त्याबाबत नागरिक व व्यापाऱ्यांना सूचना देण्याचे काम सुरू असल्याचे येथील सरपंच विजय विगावे यांनी सांगितले. 

""कचरा टाकणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी आम्ही नागरिकांच्या सहकार्याने ही अभिनव संकल्पना हाती घेतली असून, त्याचा निश्‍चितपणे चांगला परिणाम समोर येईल, असा विश्वासही आहे.'' 

अमोल पाटील, सरपंच, मंद्रुळकोळे 


संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT