सातारा

आम्हांला हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरु करु द्या : सातारा टुरिझम असोसिएशन

उमेश बांबरे

सातारा : राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या पाचव्या टप्प्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास काही अटी व शर्तींवर परवानगी दिलेली आहे; पण पर्यटन स्थळाजवळील निवासी हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही.
पोलिसांनी सौजन्य दाखवले तर कसा होतो कायापालट, वाचा सविस्तर

त्यामुळे या हॉटेल्सवर अवलंबून व्यावसायिक व कामगारांचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवासी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा टुरिझम असोसिएशनचे चंद्रसेन जाधव व विनोद कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गावे 111; बंदोबस्तासाठी फक्त 50 पोलिस
 
निवेदनात श्री. जाधव व श्री. कुलकर्णी यांनी म्हटले, की कोरोनाच्या लॉकडाउनमुळे जिल्ह्यातील सर्व प्रकारची हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस गेले साडेपाच महिने बंद अवस्थेत आहेत. जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळे असून, त्या परिसरात हॉटेल्स, रिसॉर्टस, निवास न्याहरी योजनेतील कृषी पर्यटन केंद्रे मोठ्या प्रमाणावर आहेत.

पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्‌विट  

बंदमुळे या व्यावसायिकांचा आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांच्या उत्पन्नाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या अनुषंगाने शासनाच्या मिशन बिगीन अगेनअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्रकारची निवासी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्यास परवानगी द्यावी. जिल्हा टुरिझम असोसिएशन ही संस्था पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नांबरोबरच पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनी व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणीं संदर्भात या संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज्याच्या क्रीडा विभागातील उपसंचालकासह जिल्हा, तालुका क्रीडाधिकाऱ्यांची बदली 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

SCROLL FOR NEXT