koregaon 
सातारा

चार वर्षांपासून निघेना रस्त्याच्या कामाचा मुहूर्त

साहेबराव हाेळ

गोडोली (जि. सातारा) ः अंबवडे (संमत कोरेगाव) ते गुजरवाडी या रस्त्यांचे खडीकरण- डांबरीकरणाचे काम मंदगतीने सुरू आहे. निम्म्या रस्त्यापर्यंत खडीकरण व डांबरीकरण झाले आहे. उर्वरित कामासाठी फक्त खडी टाकली आहे. गेल्या चार वर्षांपासून अर्धवट असलेले हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. 

या कामासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या उपविभागाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 2015-16 या सालात अंबवडे (संमत कोरेगाव) ते गुजरवाडी रस्त्यासाठी सात कोटी 55 लाख खर्च मंजूर झाला होता. त्यातील निम्म्या अंतराचे काम पूर्ण झाले आहे. बबनराव भोसले यांच्या शेतापर्यंत रस्त्यासाठी खडीचे ढीग टाकलेले आहेत. गुजरवाडीपर्यंत रस्ता होणे गरजेचे आहे. या रस्त्यामुळे किन्हई, पेठ किन्हई, अंबवडे (संमत कोरेगाव), बर्गेवाडी, नांदगिरी, खडखडवाडी, गणेशवाडी, मध्वापूरवाडी, चंचळी, शेंदुरजणे, खेड, जांब या गावांतील शेतकऱ्यांना वाठार स्टेशन, लोणंद, वाई, फलटण येथील बाजारपेठेशी कमी वेळात संपर्क साधता येणार आहे. या रस्त्यामुळे वेळ व इंधन वाचणार आहे. शिवाय डोंगरातील उत्पादित केलेल्या शेतमाल व उसासारखे पीक कारखान्यापर्यंत नेणे सुलभ होणार आहे. संबंधित कामाला 10 ऑगस्ट 2016 ला तांत्रिक मान्यता मिळाली आहे. वास्तविक आजपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. 

काम अर्धवट झाल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. गुजरवाडीमार्गे वाठार स्टेशन भागात माल घेऊन जाणेही अडचणीचे झाले आहे. सध्या सातारारोडमार्गे लांबून बाजारपेठेशी संपर्क साधावा लागत आहे. त्यामुळे वेळ व पैसा नाहक जात आहे. संबंधित ठेकेदाराने व शासकीय यंत्रणेने त्वरित उर्वरित काम पूर्ण करून शेतकऱ्यांची व वाहनचालकांची सोय करावी, अशी मागणी होत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT