Maharashtra Tourism Development  sakal
सातारा

सातारा : पर्यटन विकासासाठी ३६ कोटींचा निधी

तापोळा, महाबळेश्‍वर, नायगावचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

सातारा : प्रादेशिक पर्यटन विभागाकडून पर्यटनाच्या विकासासाठी जिल्ह्याला २०२१-२२ मध्ये ३६ कोटी २२ लाख ४८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये जुन्या कामांसाठी सात कोटी ४४ लाख, तर नवीन कामांसाठी २८ कोटी ७८ लाख १३ हजार रुपयांच्या निधीचा समावेश आहे. नवीन कामांमध्ये तापोळा, पाचगणी, नायगावातील काही कामांसह माण तालुक्यातील वीरकरवाडी येथील मेंढपाळ सौंदर्यशिल्प, गजीनृत्याचे शिल्प, दौलतनगरातील शिवसृष्टीचा समावेश आहे.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. पर्यटन विभागाकडून २०२१-२२ मध्ये एकूण ३६ कोटी २२ लाख ४८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सात कोटी ४४ लाख रुपये, तर नवीन कामांसाठी २८ कोटी ७८ लाख १३ हजाराच्या निधीचा समावेश आहे. या निधीतील नवीन कामांमध्ये तापोळा येथील जलाशयाभोवती घाट बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, बंदिस्त गटारे व

शौचालयांचा समावेश असून या कामांसाठी चार कोटी ९८ लाख १२ हजाराच्या खर्चास प्रशासकीय मान्यता होती. त्यापैकी दोन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. पाचगणी येथील टेबललॅण्ड व पारशी पॉइंटवर गॅलरी उभारण्यासाठी दोन कोटींची मान्यता मिळाली होती. त्यापैकी ७५ लाखांचा निधी मिळाला आहे. धुळदेव (ता. माण) येथे कामांसाठी दोन कोटी सात लाखांची मंजुरी होती. त्यापैकी एक कोटी पाच लाख रुपये दिले आहेत. त्यामध्ये देवस्थान परिसर घाट बांधण्याच्या कामांचा समावेश आहे. नायगाव (ता. खंडाळा) येथे सांस्कृतिक सभागृह, प्रतीक्षालय उभारण्यासाठी दोन कोटी ११ लाखांची मंजुरी होती. त्यापैकी ५० लाख रुपये उपलब्ध झालेत.

महाबळेश्वर येथे साबणे रोड व लायब्ररीची सुधारण करण्यासाठी ५२ कोटींची मंजुरी होती. त्यापैकी १५ कोटी ६० लाख उपलब्ध झाले आहेत. मार्डी (ता. माण) येथील विकासकामांसाठी दीड कोटींची मान्यता होती, त्यापैकी ५० लाख उपलब्ध झालेत. चवणेश्वर रस्त्यासाठी दोन कोटी २३ लाखांपैकी ७५ लाख आलेत. किवळ (ता. कऱ्हाड) येथील शिवकालीन तळे व इतर कामांसाठी पाच कोटींची मान्यता होती. त्यापैकी एक कोटी ३५ लाख मिळाले आहेत. किन्हई देवस्थान रस्ता आणि पार्किंगसाठी एक कोटी २२ लाखांची मंजुरी होती, त्यापैकी ३७ लाख मिळाले आहेत. कोयनानगरातील दौलतनगर स्मारक परिसरात शिवसृष्टीचे काम पाच कोटींचे असून एक कोटी उपलब्ध झालेत. पाचगणी येथील टेबललॅण्डच्या कामासाठी दोन कोटी २६ लाखांपैकी ९० लाख मिळालेत. भिलार, बोरगाव, वाघाळे या रस्त्यांसाठी एक कोटी ४० लाखांपैकी २८ लाख रुपये आले आहेत.

कोयनानगरला पर्यटकांसाठी निसर्ग परिचय केंद्र उभारण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी पाच कोटींची मंजुरी होती. त्यापैकी एक कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्यातील या पर्यटन विकासासाठी ८९ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांना २८ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

वीरकरवाडी (ता. माण) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुधारणा करण्यासाठी एक कोटी ५० लाखांची मंजुरी होती. त्यापैकी १७ लाख १३ हजार उपलब्ध झाले आहेत. मेंढपाळ सौंदर्यशिल्प उभारणे, घाट बांधकामासाठी एक कोटी ४३ लाखांपैकी एक कोटी पाच लाख उपलब्ध झालेत. तेथे त्रिमितीय गजीढोल सौंदर्यशिल्प उभारण्यासाठी ५० लाख रुपये मिळाले असून जे. जे. स्कूल ऑफ आर्टकडून हे शिल्प उभारले जाणार आहे.

शिखर शिंगणापूर येथे एमटीडीसीच्या वतीने पर्यटकांसाठी निवासाची बांधणी करण्यात येत असून त्यासाठी चार कोटी ९४ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी एक कोटी ४८ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT