Court Sakal
सातारा

सातारा : कोरेगाव न्यायालयासाठी 60 लाखांचा निधी मंजूर

कोरेगाव येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाच्या मंजुरीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी केले प्रयत्न

राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : कोरेगाव येथील न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ६० लाखांचा निधी उपलब्ध करून घेतल्याची माहिती कोरेगाव तालुका बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

कोरेगाव येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाच्या मंजुरीसाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान, कोरोनामुळे निधीअभावी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम रखडल्याच्या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनच्या वतीने अॅड. जयवंतराव केंजळे, अॅड. टी. आर. पवार, अॅड. अशोककुमार वाघ, अॅड. बारसावडे, अॅड. नीलेश झांजुर्णे, अॅड. भैय्यासाहेब जगदाळे, अॅड. पी. सी. भोसले, अॅड. रणजित भोसले आदींनी काही दिवसांपूर्वी आमदार शिंदे यांची भेट घेतली होती. कोरेगाव येथील दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या निधीअभावी बंद आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व नवीन इमारत वापरात आल्यानंतर पक्षकारांची गैरसोय दूर होणार आहे.

वास्तुकलेचा अव्दितीय नमुना असलेली जुनी १९२३ मधील इमारत सुस्थितीत आहे; परंतु ती अपुरी आहे. सध्या या ठिकाणी तीन न्यायाधीश कामकाज करतात. वकील संघाच्या सदस्यांची संख्या सुमारे १५० आहे. या पार्श्वभूमीवर निधीअभावी बंद असलेल्या नव्या इमारतीच्या बांधकामास तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा. त्यामध्ये सुसज्ज फर्निचर, अद्ययावत संगणक प्रणाली, सुसज्ज संगणकीय ग्रंथालय या बाबी विचारात घ्याव्यात. त्याचबरोबर जुन्या इमारतीची लवकरच शतकपूर्ती होणार असल्याने या पुरातन वास्तूच्या पुनर्निर्माणासाठीही भरीव निधीची तरतूद करून २०२१-२२ पर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याची विनंती या पदाधिकाऱ्यांनी केली होती.

त्यावर न्यायालयाच्या इमारतीचे काम पुन्हा सुरू करण्याबरोबरच न्यायालयाची जुनी इमारत हेरिटेज म्हणून जतन करण्याच्या दृष्टीने या इमारतीच्या नूतनीकरणासह न्यायालयाच्या आवारातील मंजूर कामे पूर्णत्वास नेली जाणार असल्याचे व त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेतला जाणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले होते. त्यानुसार कोरेगाव येथील न्यायालयाच्या इमारतीच्या कामासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ६० लाखांचा निधी उपलब्ध करून घेतल्याची माहिती कोरेगाव तालुका बार असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT