Satara 
सातारा

साकव पुल ऑक्‍टोबरअखेर पूर्ण करण्याची ग्वाही

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात साकव पुलांची कामे मजूर टंचाई आणि कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे अपूर्ण असून, ही कामे ऑक्‍टोबरअखेर पूर्ण केली जातील. त्या ठिकाणी असणारे पोट रस्ते, साकव पुलांचे संरक्षक कठडे, पुलांचा स्लॅब, वाहतुकीस अडथळा ठरणारे ठेकेदाराने टाकलेल्या साहित्याबाबत काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. 

"पाटण तालुक्‍यात साकव पुलांची कामे निकृष्ट दर्जाची' ही बातमी दैनिक "सकाळ' मध्ये शनिवारी (ता. 26) प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने हा खुलासा केला आहे. पाटण तालुक्‍यातील साजूर ते हेळवाक रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या साकव पुलांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. ही कामे सुमार दर्जाची झाली आहेत. या कामामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तक्रार करूनही बांधकाम खात्याचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करत होते. ठेकेदार आणि बांधकाम खात्याचे अधिकारी यांच्या संगनमताने हा प्रकार पाटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा सूर नागरिकांमधून व्यक्त होत होता. ती सर्व कामे आता ऑक्‍टोबरअखेर पूर्ण केली जाणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

""कुसरूंड (ता. पाटण) येथील सुतार वस्तीजवळ कामांची पाहणी केली जाईल. हे काम जास्तीत जास्त 15 दिवसांत पूर्ण करून हा साकव पूल वाहतुकीस योग्य असा केला जाईल. ग्रामस्थांनीही त्या ठिकाणी उभे राहून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे.'' 
-आर. एच. खंडागळे, 
शाखा अभियंता, 
सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटण 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT