आदर्श महिला बचत गट, कुसावडे
आदर्श महिला बचत गट, कुसावडे sakal
सातारा

सातारा : देशी कडधान्ये अन् डाळींची विक्री

सकाळ वृत्तसेवा

कुसावडे हे गाव कृषिप्रधान आहे. दहा वर्षांपूर्वी कोरडवाहू असलेल्या कुसावडेत तलावाचे काम झाले आणि बारमाही शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा होऊ लागला. ऊस, हळद, आले या नगदी पिकांबरोबरच ते भात, गहू विविध कडधान्य लागवड करू लागले. २००१ नाबार्ड पुरस्कृत बचत गट निर्मिती व संगोपन या प्रकल्पांतर्गत अवॉर्ड संस्थेने गावात महिला बचत गट स्थापनेस सुरुवात केली आणि गावात सहा गटांची निर्मिती झाली.

उषा सराटे आणि राजश्री चव्हाण यांनी पुढाकार घेत २०११ मध्ये आदर्श महिला गटाची स्थापना केली. या गटात एकूण १३ महिला सहभागी आहेत. या सर्व शेतकरी आहेत. सुरुवातीला प्रत्येकी दरमहा १०० रुपयांची बचत करणारा हा गट आता प्रत्येकी दरमहा ५०० रुपयांची बचत करतो. नियमित बैठका, प्रशिक्षणे, अभ्यास सहली, बँक संलग्नता, विविध प्रदर्शनातील सहभाग या माध्यमातून गटातील महिलांमध्ये उद्योजक गुण विकसित झाले. अन्य कोणतेही व्यवसाय न करता आपल्याच शेतात उत्पादित होणारा शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची थेट विक्री आठवडा बाजारात आणि विविध विक्री प्रदर्शनात करण्याची भूमिका संस्थेच्या सचिव नीलिमा कदम यांनी महिलांपुढे मांडली आणि त्यातूनच या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मुळातच तरकारी असल्याने शेतीमाल विक्री करताना कमीपणा न मानता आज गटातील सात महिला सातारा बाजारपेठेत गुरुवार आणि रविवारी घेवडा, चवळी, वाटाणा, मूग, मटकी, हरभरा ही कडधान्ये व जात्यावर तयार केलेल्या डाळींसोबत तांदूळ, गहू, भुईमूग, देशी अंडी यांचीही विक्री करतात. स्वच्छ माल, योग्य किंमत, देशी वाण आणि सेंद्रिय पद्धतीमुळे या शेतीमालाला नियमित ग्राहक मिळत आहेत. या मालाला मागणीही वाढत आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्या स्वावलंबी झाल्या आहेत. या गटाने आजअखेर संस्थेच्या मदतीने बँकेकडून चार वेळा जवळपास १५ लाखांचे कर्ज घेऊन त्यातून शेती सुधारणा, कृषी यांत्रिकीकरण, दुग्ध व्यवसाय यासारख्या उत्पादन देणाऱ्या बाबींमध्ये खर्च केले व त्याची वेळेवर परतफेडही केली आहे. अध्यक्ष उषा सराटे, सचिव राजश्री चव्हाण, जयश्री गोडसे, शेवंता सराटे, रेश्मा यादव, संगीता कदम, मंगल महाडिक, वैशाली गोडसे, सुवर्णा सराटे, पूनम यादव, चित्रा दळवी, मयूरी चव्हाण, शीला यादव, चंद्रभागा मोरे यांचा गटात सहभाग आहे.

आपल्याच शेतात उत्पादित होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याची थेट विक्री कुसावडे (ता. सातारा) येथील आदर्श गटाच्या महिला बाजारात आणि साताऱ्याच्या मंडईत करत आहेत. त्या घरी जात्यावरच विविध प्रकारच्या डाळी तयार करत असतात. चांगल्या जीवनसत्त्व युक्त, सेंद्रिय डाळी, धान्य मिळत असल्याने बाजारपेठेत भरपूर ग्राहक मिळाले आहेत. त्यातून गटातील महिला स्वावलंबी झाल्या आहेत.

- दिलीपकुमार चिंचकर

आम्ही साऱ्या जणी विविध प्रकारच्या डाळी घरी पारंपरिक पद्धतीने जात्यावरच करतो. डाळींबरोबरच सेंद्रिय तांदूळ, गहू, चवळी, मूग, देशी अंडीही विक्रीस असतात. या विक्रीतून आम्ही आता बऱ्यापैकी स्वावलंबी होत आहोत.

- उषा सराटे, अध्यक्ष,आदर्श महिला बचत गट, कुसावडे (ता. सातारा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT