कऱ्हाडचा युवक ठार  sakal
सातारा

संगमनेरातील अपघातात कऱ्हाडचा युवक ठार

रात्री काम संपवून परतताना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या कारने जोराची धडक दिली.

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : येथील युवा उद्योजक निशात वसंतराव महाडीक (वय ४२) यांचे संगमनेर येथे अपघतात निधन झाले. काल रात्री उशिरा संगमनेरच्या सेवा रस्त्यावर त्यांच्या दुचाकीला मागून कारने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. मोबाईलच्या विवो कंपनीत ते एरिया मॅनेजर म्हणून काम पाहत होते. शहरातील युवा उद्योजक म्हणून त्यांचा लोकीक होता.

पोलिस व घटनास्थळवरील माहिती अशी ः निशात महाडीक यांचे रेठरे बुद्रूक मुळगाव आहे. मात्र नोकरी व व्यवसायानिमित्त ते शहरात स्थायिक आहेत. निशात महाडीक व्यवसायिक म्हणूनही शहरात परिचीत आहेत. विवो कंपनीच्या संगमनेर भागात त्यांनी काम घेतले होते. त्या बागातील एरिया मॅनेजर म्हणून ते काम होते. काल रात्री काम संपवून परतताना त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव आलेल्या कारने जोराची धडक दिली.

त्यात ते जागीच ठार झाले. त्यांच्या अपघाताचे वृत्त कऱ्हाड येथे समजताच त्यांचे आप्त स्वकीयांसह नातेवाईक व मित्रांनी संगमनेर येथे धाव घेतली. निशांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार यांचे भाचे तर येथील व्यवसायिक नितीन महाडीक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. निशात यांच्या निधनानेन येथील रूक्मीणीनगर परिसरात शोककळा पसरली होती. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मृतदेह येथे आणण्यात आला. त्यानंतर काही वेळाने मृतदेह त्यांच्या रेठरे बुद्रूक या मुळगावी नेण्यात आला. तेथे त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT