Satara 
सातारा

शेतीपंपांच्या वीजपुरवठ्याचे वेळापत्रक अन्यायी, शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

सुहास शिंदे

पुसेसावळी (जि. सातारा) : "महावितरण'ने जुलै महिन्यासाठी शेतीपंपांसाठी वीज उपलब्धतेबाबत जाहीर केलेले वेळापत्रक हे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून, त्यात बदल न केल्यास पुसेसावळीसह खटाव तालुक्‍यात महावितरणविरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा खटाव तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे. 

श्री. पवार यांनी पत्रकात म्हटले आहे की, जुलै महिन्यामध्ये शेतीपंपांसाठी आलेले वेळापत्रक रात्री पावणेनऊ ते सकाळी पावणेसात तर दिवसा पावणेआठ ते पावणेचार असे आहे. हे वेळापत्रक पूर्णतः अन्यायकारक असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत शेतीपंपांसाठी वीज उपलब्ध असायला हवी. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांची शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दिवसभर शेतामध्ये राबून पुन्हा रात्री पाण्यावर जाणे कोणत्याही शेतकऱ्याला शक्‍य नाही. तसेच पावसाळ्यात शेतीपंपांसाठी विजेची मागणी कमी असते आणि तरीही "महावितरण'ने हे अन्यायकारक वेळापत्रक शेतकऱ्यांवर का लादले आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.

सध्या पावसाळ्यामुळे शेतात हिरवे गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साप, विंचू व इतर जीवघेण्या श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी पिकाला पाणी देणे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मागील काही दिवसांत शेतकऱ्यांना दिवसा चार तास वीज देण्याचे सूतोवाच केले होते. मात्र, याउलट वीज मंडळाने सध्याचे शेतीपंपांचे वेळापत्रक अन्यायकारक दिले असून, त्यात तत्काळ बदल न केल्यास पुसेसावळीसह खटाव तालुक्‍यात शेतकरी आंदोलन उभारावे लागेल. पत्रकावर सुहास पिसाळ, संतोष कदम, श्रीकांत कदम, दिलीप यादव, सूरज पवार व परिसरातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

वेळापत्रक तातडीने बदल करा 

याबाबत रयत शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे म्हणाले, ""खटाव तालुक्‍यातील शेतीपंपांचे जुलै महिन्यातील वेळापत्रक अन्यायकारक असून, यामध्ये योग्य बदल "महावितरण'ने तातडीने करावा, अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.'' 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT