karad 
सातारा

शाळा बंद; शिक्षकांच्या बदल्यांचा अट्टाहास का?

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) ः कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचे चिन्हे नाहीत. त्यामुळे शाळांचे दरवाजे बंदच आहेत. शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू झाले आहे. एकीकडे ऑनलाइनमध्ये शिक्षक रमू लागले असतानाच आता शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदल्यांची तयारी केली आहे. बदल्यांच्या घोळात ऑनलाइन शिक्षणावर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शिक्षक बदल्यांचा अट्टाहास का, असा सवाल करत शिक्षक या निर्णयावर अस्वस्थता व्यक्त करीत आहेत. 

यावर्षी कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. असे असताना 7 जुलै 2020 रोजी शासनाने परिपत्रक काढून 31 जुलै 2020 पूर्वी सर्व विभागांतील बदल्या कराव्यात, असे आदेश दिले. शिक्षकांच्या बदल्यांमधील गुंता लक्षात घेता खासगी संस्थेच्या संगणकीय प्रणालीमार्फत बदल्या न करता जिल्हास्तरावर ऑफलाइन बदल्या करण्याचे स्वतंत्र परिपत्रक 15 जुलै 2020 रोजी काढले. पुन्हा 23 जुलै रोजीच्या परिपत्रकांनुसार सर्वच बदल्यांना 10 ऑगस्टपर्यंत वाढवून वेळ दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. अशातच शिक्षकांच्या बदल्या झाल्या तर मुलांच्या शिक्षणात अनेक अडचणी येणार आहेत. 

नवे शिक्षक- विद्यार्थी यांची ओळख नसल्यामुळे त्यांना कितपत शिकवलेले समजेल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे बदल्यांची मुदत उलटून गेलेली असताना शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी बदल्या न झाल्यामुळे यावर्षी बदल्यांना स्थगिती मिळावी, अशी मागणी शिक्षकांतून होत आहे. प्रचलित बदली प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार पुढील शैक्षणिक वर्षात सुधारित पद्धतीने बदल्या केल्या जाव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे. 

बदलीतील असेही प्रवाह 
राज्य शासनाच्या 27 जुलै 2020 च्या निर्णयानुसार संवर्ग एक आणि दोन अशा टप्प्यांत ऑफलाइन 15 टक्के बदल्यांमुळे शैक्षणिक सत्राच्या अवेळी अनेकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर 2018- 2019 च्या बदली प्रक्रियेत विस्थापित झालेले व रॅण्डम राउंडला गेलेले यांना अजूनही वेट अँड वॉच करावे लागणार आहे, असा मतप्रवाह व्यक्त होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: समुद्र, शॉपिंग आणि मनोरंजनाचा संगम... मुंबईला मिळाले नवे पर्यटनस्थळ; इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल आता सर्वसामान्यांसाठी खुले

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या खिलाडूवृत्तीवर संशय? कर्णधार श्रेयस अय्यर संतापला, दुसऱ्या सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं?

१०० पुरुष, १५ महिलांशी शारीरिक संबंध, रात्रीच्या वेळी दारु पाजायचा अन्...; HIV पॉझिटीव्ह डिलीवरी बॉय निघाला सायको किलर

Career Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांचे नशीब असते बलवत्तर! कोणतीही परीक्षा एका झटक्यात होतात पास, समाजात मिळवतात मोठं स्थान

Latest Marathi News Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरी प्रकरण दाबण्याचा कोणताही प्रयत्न करू नये - टीएमसी नेते कुणाल घोष

SCROLL FOR NEXT