Satara 
सातारा

बियाणे महामंडळाचेच बियाणे निघाले खराब; आजवर 42 तक्रारी दाखल

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (जि. सातारा)  : शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याने ऐन पावसाळ्यात त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यातील बहुतांश बियाणे हे बियाणे महामंडळाचे असल्याने शेतकऱ्यांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या नशिबी हे संकट आल्याने आणि त्यांचे श्रमही मातीमोल झाल्याने शेतकरीही हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 42 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. 

अनेक वर्षांनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी यंदा हे संकट मोठ्या प्रमाणात आले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने खरीप हंगामात पेरलेले बियाणेच न उगवल्याच्या जिल्ह्यातील 42 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. पेरलेल्या बियाणांपैकी बहुतांश बियाणे हे बियाणे महामंडळाचेच असून, त्यामध्ये काही खासगी कंपन्यांच्या बियाणांचाही समावेश आहे. मात्र, शासनाच्या बियाणे महामंडळाच्याच बियाण्याने दगा दिल्याने शेतकऱ्यांतूनही आश्‍चर्यच व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या नशिबी हे संकट आल्याने त्यातून कृषी विभाग त्यांना कसा सावरणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 
दरम्यान, कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्‍यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखील एक समिती करून बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यास प्रारंभ केला आहे. 

फौजदारी कारवाई 

शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनाने दोन पर्याय ठेवले आहे. ज्या कंपनीचे बियाणे उगवले नाही त्यांनी शेतकऱ्यांना बियाणे बदलून देणे किंवा संबंधित बियाणे पैसे देणे हे दोन पर्याय ठेवले आहेत. त्यातूनही कंपनीने शेतकऱ्यांना वेळेत भरपाई न दिल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जावरून संबंधित कंपनीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा कृषी विभागाकडून दाखल करण्याचेही शासनाने निर्देशित केले आहे. 


कोट... 
""सातारा जिल्ह्यात 42 शेतकऱ्यांच्या बियाणे न उगवल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करण्याची कार्यवाही कृषी विभागाकडून सुरू आहे. पंचनामे झाल्यावर भरपाईसंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल.'' 

विजयकुमार राऊत, 
जिल्हा अधीक्षक, 
कृषी अधिकारी, सातारा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT