khatav 
सातारा

गटार दारात अन्‌ सांडपाणी घरात?

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : गावातील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करताना दुतर्फा उंच व मोठ्या गटारचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे बहुतांश सांडपाणी गटारात जाण्याऐवजी घरातच येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. 

येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ- पंढरपूर रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. त्यात येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधकामास सुरुवात झाली आहे. त्यास येणारा अडथळा दूर करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे लोकांनी काढून घेतली. कंत्राटदाराला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू झाले. काम थांबले. अनलॉक एकचा टप्पा सुरू होण्यापूर्वीच पुन्हा कामाला सुरुवात झाली. मात्र, काही ठिकाणी रस्त्याची व गटारांची रुंदी कमी-जास्त केल्याचे, गटारची उंची त्रासदायक असल्याच्या तक्रारी करण्यास लोकांनी सुरुवात केली. काही नागरिकांनी लेखी तक्रारी केल्या. त्याद्वारे गटारची उंची कमी करण्याची मागणी केली आहे. उंच गटार त्रासदायक असून, त्यामुळे सांडपाणी गटारामध्ये न जाता ते घरात साचणार आहे. 

बाजारपेठेत रस्त्यालगत अनेक इमारतींत बेसमेंटला (तळघरात) दुकान गाळे काढण्यात आले आहेत. गटाराच्या उंचीमुळे तळघरांतील गाळेधारकांच्या समस्यांत वाढ होणार आहे. मुख्य रस्त्याला लागूनच असलेल्या बाजार पटांगणावर आठवडा बाजारासह दैनंदिन मंडई व फळेविक्रेते बसतात. उंच गटारामुळे तेथे मालाची ने-आण करणे अशक्‍य अथवा जिकिरीचे होईल, असे अनेक व्यावसायिकांचे मत आहे. नागरिकांच्या गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून संपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. 

दरम्यान, महिनाभरात संपणारे गटार व रस्ता रुंदीकरणाचे काम अद्याप संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दुकानांची दुरुस्ती व नव्याने उभारणीची कामेही खोळंबली आहेत. बाजारपेठेकडे ग्राहक पाठ फिरवत आहेत. बाजारपेठ कोलमडून पडली आहे. आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी रोजीरोटीच्या प्रश्नासह अनेकांचे संसार उघड्यावर येऊ लागलेत. बाजारपेठ पूर्ववत कधी बहरणार या विवंचनेने सर्व व्यावसायिक अस्वस्थ झाले आहेत. 


अयोग्य पद्धतीने सुरू असलेले रस्ता रुंदीकरणांतर्गत गटारचे कामास जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती द्यावी. व्यावसायिक व रहिवाशांना दिलासा द्यावा. 

- धैर्यशील चव्हाण, तक्रारदार नागरिक, मायणी 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT