सातारा

शिखर शिंगणापूराला जाणार आहात? थांबा! प्रांताधिका-यांचा आदेश वाचा

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरसह वावरहिरे, डंगिरेवाडी व मोही गावांमध्ये प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी कलम १४४ लागू केले आहे. आजपासून (ता. 10) 13 मार्चपर्यंत संबंधित गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. 

महाशिवरात्रीनिमित्त शंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. महाशिवरात्रीदिवशी शिखर शिंगणापूर येथे एखाद्या छोट्या गावच्या यात्रेप्रमाणे गर्दी असते. यासोबतच या परिसरातील पाणलिंग मंदिर वावरहिरे, शंभू महादेव मंदिर डंगिरेवाडी, बेलदेव मंदिर मोही यासह माण तालुक्यातील महाशिवरात्रीचा कार्यक्रम होणारी इतर सर्व मंदिरे १० मार्च मध्यरात्रीपासून १३ मार्च मध्यरात्री पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

शिंगणापूर व परिसरातील संबंधित गावातील रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास तसेच साखर, पेढे वाटणे, गुलाल उधळणे, फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या गावांमधील सर्व दुकाने या काळात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सातारा : कुठे मिळणार काेव्हॅक्सीन लस, सविस्तर वाचा  

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT