सातारा

#MondayMotivation प्राण तळहातावर घेऊन शिशिर ताईगडेचा लढा

सकाळ वृत्तसेवा

तळमावले (जि.सातारा) ः महाराष्ट्र शासन संचलित राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत 108 ही रुग्णवाहिका वेळेवर येत नाही, चालक टंगळमंगळ करतात, अशा एक ना अनेक तक्रारी केल्या जातात; पण याला छेद देऊन प्रामाणिकपणे व वेळेचे बंधन पाळून आपली तत्पर सेवा देत शिशिर ताईगडे या युवकाने आजवर शेकडो अत्यावस्थ, अपघातग्रस्त रुग्णांना मुंबई, कांजूरमार्ग, कळवा या ठिकाणी सेवा दिली आहे. कित्येक गरोदर मातांना इच्छितस्थळी सुखरूप पोचवले आहे. आता तर शिशिर हा गेले चार महिने कोरोनाग्रस्त रुग्णांना अत्यावश्‍यक सेवा निर्भीडपणे देत आहे. 

कोरोनाग्रस्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला तर बऱ्याचवेळा रुग्णवाहिका चालक या रुग्णाला नेताना भीती बाळगतात वा नेण्यासही टाळतात. अशा घटना आपण पहिल्या आहेत. पण, निर्भीड आणि रुग्णसेवेची जाण ठेवून शिशिर आपले कर्तव्य बजावतो आहे. शिशिर हा मूळचा ताईगडेवाडी (तळमावले) येथील रहिवासी आहे. शिशिरचे सध्या सुरू असलेले काम पाहून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आशा कोरोना योद्‌ध्याला आमचा कायम पाठिंबा असेल, असे लोक अभिमानाने सांगत आहेत. 

शिशिर हा रुग्णवाहिका चालक म्हणून जे काम करत आहे, त्याचा अभिमान आहे. कोरोनाच्या संकटावेळी प्रामाणिक काम करून सेवा बजावत असल्यामुळे त्याला शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया तळमावल्याचे उपसरपंच अंकुश आतकरी यांनी व्यक्त केली आहे. 

राष्ट्रवादीतर्फे दहा जूनला रक्तदान शिबिर; युवकांना नोकरीसाठी नोंदणीचे आवाहन

एक अंगावर येणारा अनुभव 

सातारकरांनाे काेणत्या भागात पाणी येणार नाही. कधी येणार नाही. सविस्तर वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT