Shivendrasinharaje Meets Sambhaji Raje  sakal
सातारा

सातारा : शिवेंद्रसिंहराजे-संभाजीराजेंची महामार्गावर भेट

राजकीय वर्तुळात गरमागरमी; पाठराखण केल्‍याच्‍या ४८ तासांतच दोघांची भेट

सकाळ वृत्तसेवा

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची आज सायंकाळी महामार्गावरील लिंबखिंड परिसरात भेट झाली. भेटीदरम्‍यान थोडावेळ अनौपचारिक चर्चा केल्‍यानंतर ते दोघेही मार्गस्‍थ झाले. दोनच दिवसांपूर्वी राज्‍यसभेच्‍या उमेदवारीत डावलल्‍याच्‍या कारणावरून शिवेंद्रसिंहराजे यांनी छत्रपती संभाजीराजे यांची बाजू घेत राजकीय भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडल्‍यानंतर ४८ तासांच्‍या आत त्‍यांच्‍या झालेल्‍या भेटीने पुन्‍हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्‍यसभेच्‍या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली तसेच उध्‍दव ठाकरे यांनी शब्‍द फिरवल्‍याची प्रतिक्रिया देत टीकाही केली होती. याच अनुषंगाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील संभाजीराजे छत्रपती यांची बाजू घेत त्‍यांचा गेम झाल्‍याची प्रतिक्रिया दिली होती. आज सायंकाळी शिवेंद्रसिंहराजे हे नियोजित कार्यक्रमासाठी कुडाळ येथे निघाले होते. त्‍यांच्‍या पाठोपाठ संभाजीराजे छत्रपती हे कोल्‍हापूर येथून पुण्‍याकडे निघाले होते. लिंबखिंड येथे दोन्‍ही गाड्या महामार्गावरून समांतर निघाल्‍या होत्‍या.

दोघांनी एकमेकांना पाहिल्‍यानंतर थांबण्‍याचा इशारा केला. यानुसार लिंबखिंड परिसरातील महामार्गालगत दोन्‍ही वाहने थांबली. थांबलेल्‍या वाहनातून शिवेंद्रसिंहराजे आणि संभाजीराजे बाहेर आले व त्‍यांनी काही काळ एकमेकांशी चर्चा केली. थोडा वेळ चर्चा केल्‍यानंतर ख्‍यालीखुशाली विचारून शिवेंद्रसिंहराजे कुडाळ तर संभाजीराजे पुण्‍याकडे पुन्‍हा मार्गस्‍थ झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

Kasaba Borgaon Drowning : चार बहिणीनंतर विकासचा जन्म, दोन महिन्यांपूर्वीच झालेला विवाह; कासारी नदीत बुडून 32 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत, पन्हाळ्यातील दुर्घटनेने हळहळ

Crime News: पत्नीचे ऐकत नाही म्हणून जावयाला मारहाण; तिघांवर गुन्हा

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT