सातारा

....तर विधीमंडळात आवाज उठवू, शिवसैनिकांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः सातारा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याच्या गळचेपीच्या प्रयत्ना विरोधात कठोर कारवाई करावी. तसेच आवश्‍यकता भासल्यास विधीमंडळात आवाज उठवला जाईल असा इशारा जिल्हा शिवसेनेने निवेदनाद्वारे आज (बुधवार) जिल्हा प्रशासनास दिला आहे. काही दिवसांपूर्वी सातारा पालिकेत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना ठेकेदाराकडून मारहाण झाली. त्यापार्श्वुभमीवर शिवसैनिकांनी जिल्हा प्रशासनास निवेदन दिले. 
 
शिवसेनाचा जन्मच संघर्षातून झालेला आहे. संघर्ष आम्हांला नवीन नाही. जाहीर आव्हान दिले तर कोणत्याही स्थळी व कोणाशीही कसलाही संघर्ष करण्याची आमची तयारी आहे. भ्याड हल्याला व खोट्या केसेसला आम्ही घाबरत नाही असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकान्वये दिला आहे. या निवेदनात म्हटले आहे, माजी जिल्हा प्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर झालेला भ्याड हल्ला व खोट्या केसेस प्रकरणी सखोल चौकशी व्हावी. सातारा पालिका भ्रष्टाचार उघड होवू नये त्या विरोधात आवाज उठवू नये म्हणून हा हल्ला झाला आहे. अशा हल्याने शिवसेना दबन जाणार नाही. आणखी कितीही हल्ले झाले, खोट्या केसेस झाल्या तरी भ्रष्टाचाराविरोधातील लढाई थांबणार नाही. या प्रकरणातील हल्लेखोर हे पुढे केलेले मोहरे आहेत. या प्रकरणातील खरे सूत्रधार बन्या आणि मन्या आहेत. बायोमायनींग आरोग्य विभागातील कचरा टेंडर निसर्गला दिलेले बागेचे, दलीत वस्तीच्या कामातील ठेक्‍याचा घोटाळे असे एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आगामी काळात शिवसेनेच्या वतीने धसाला लावली जातील. पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करताना किमान खातरजमा करुन घेणे गरजेचे होते.

सातारा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्याच्या गळचेपीच्या प्रयत्ना विरोधात कठोर कारवाई करावी. तसेच आवश्‍यकता भासल्यास विधीमंडळात आवाज उठवला जाईल असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. दरम्यान सातारा पालिका भ्रष्टाचारी कारभाराविरोधात येत्या स्वातंत्र्यदिनी (ता.15) ध्वजवंदन झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्हा शिवसेनेच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असे जाधव यांनी नमूद केले आहे. यावेळी संजय मोहिते, दिनेश बर्गे, युवराज पाटील, तात्यासो घाडगे, हरिदास जगदाळे, दत्ताभाऊ नलावडे, अतिश ननावरे, रमेश बोराटे, सचिन जगताप, स्वप्नील कुलकर्णी, संजय भोसले, अनिल धुळप, बाळासाहेब शिंदे, शिवाजीराव इंगवले, विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखास मारहाण करणाऱ्या ठेकेदारासह सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT