सातारा

सेनेच्या माजी जिल्हाप्रमुखास मारहाण करणाऱ्या ठेकेदारासह सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना मारहाण करून खिशातील चार हजार 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी ठेकेदारासह सहा जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पवार, अनिरुद्ध शिंदे, ओमकार शिंदे व त्यांच्यासोबतच्या तीन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर खंडणी, जातीवाचक शिवीगाळचा गुन्हा दाखल 

रस्त्याच्या बांधकामाबाबत तक्रार करण्यासाठी गेलेल्या नरेंद्र पाटील यांना साेमवारी (ता. 15) सातारा नगरपालिका कार्यालयातच मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ठेकेदाराच्या वतीने (गणेश पवार) दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील यांच्यावरच खंडणी व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, नरेंद्र मोहनराव पाटील (रा. मॅगझिन कॉलनी, सदरबझार) यांच्या वतीने आज (मंगळवार) फिर्याद देण्यात आली. बांधकामाबाबत केलेली तक्रार मागे घेण्यासाठी गणेश पवारने बांधकाम अभियंत्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर सर्व संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच शर्टच्या खिशातील चार हजार 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. बदनामी करण्याच्या उद्देशाने शूटिंग केले, असे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गणेश पवार याच्यासह सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील जैव वैद्यकीय कचऱ्याबाबत प्रशासनासह पालकमंत्र्यांनीच खूलासा करावा : किशाेर शिंदे

कामगार कपातीवर राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT