सातारा

परजलेली हत्यारे आठ दिवसात म्यान

सकाळ वृत्तसेवा

सातारा 2 : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्यात सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन बिगीन अगेनच्या पहिल्या टप्यात काढून घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमावलीनुसार परजलेली हत्यारे सलून व्यावसायीकांना पुन्हा म्यान करावी लागणार आहेत. 

केंद्र शासनाने लॉकडाऊन संपवून देशाच्या अर्थ व्यवस्थेचा गाडा पुन्हा सुरू करण्यासाठी बहुतांश निर्बंध शिथील केले आहेत. परंतु, राज्यातील परिस्थीतीनुसार काही सवलती देण्यात आल्या नाहीत. राज्याच्या सुचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज आदेश काढले. मात्र, त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या परिस्थीतीत फारसा कोणताही बदल झाला नाही. उलट सलून व्यवसायावर बंधन आले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी 22 मे रोजी प्रतिबंधित क्षेत्र वगळून केशकर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने सुरु करण्यास सशर्त परवानगी देण्यात होती. त्यामध्ये व्यावसायीकांना चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड लावणे बंधनकारक केले होते. सेवा दिलेल्या ग्राहकांची नोंद नोंदवहीमध्ये ठेवणे, पहिल्या ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्चीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे अंतर असावे. वापरण्यात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करणे, ग्राहकांच्या संख्येइतके टॉवेल व कापडाची उपलब्धता दुकानदाराने करावी असे निर्बंध घातले होते. 

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षेची तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामिण भागात पहिल्यांदा उल्लंघन झाल्या पाचशे तर, दुसऱ्यांदा हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. शहरी भागात हाच दंड एक व दोन हजार एवढा होता. तिसऱ्या वेळी उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करुन दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार होती. 

त्यानुसार सलून व्यावसायीकांनी नियमांच्या पालनासाठी विविध वस्तू खरेदी करून हत्यारे परजली. दोन महिन्यानंतर हाताला काम व पोटाला हक्काचा घास मिळणार असल्यामुळे सर्व व्यावसायीक समाधानी होते. परंतु, त्यांचा हा आनंद केवळ आठ दिवसच टिकला. जिल्हाधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) काढलेल्या आदेशात सलून व ब्यूटीपार्लर दुकानांवर पुन्हा बंदी घातली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT