Satara 
सातारा

केवळ 12 तासांत हजारोंची मदत!, कशी आणि कशासाठी जमा झाली मदत ते वाचा..

प्रशांत गुजर

सायगाव (जि. सातारा) : "माय मराठी समूह' या नावाच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर एका समाजसेवकाने मदतीचे आवाहन करताच केवळ 12 तासांत 32 हजार रुपये जमा झाले. या मदतीमुळे सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ नाही तर अडल्या नडल्या लोकांना मदतीसाठी उपयोगी ठरत असल्याचे दिसून आले आहे. 

"यशोधन' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रवी बोडके हे अनाथ, बेघर लोकांसाठी काम करत आहेत. महिला आणि पुरुष अशा 35 ते 40 अनाथ आणि बेघर लोकांचा सध्या ते सांभाळ करत आहेत. "लॉकडाउन'मध्ये संस्थेमधील लोकांसह बाहेरील रोजीरोटीचा प्रश्न असलेल्या 300 लोकांना सकाळ-संध्याकाळ जेवण पुरविण्याचे काम आजही ते करत आहेत. त्यामुळे "यशोधन'ला आर्थिक अडचणी येऊ लागल्या. अखेर त्यांनी "माय मराठी' समूहाला साद घातली की निदान एक ते दोन दिवस पुरेल एवढ्या जेवणाची सोय करता येईल का ?

श्री. बोडके यांनी "माय मराठी'वर हाक देताच अगदी 100 रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत ज्यांना जमेल तशी अनेकांनी यथाशक्ती आपला हातभार लावला आणि केवळ 12 तासांच्या आत समूहातील सर्वांनी मिळून 32 हजार रुपयांची आर्थिक मदत "यशोधन'कडे जमा केली. त्यामुळे आता पुढील दोन ते अडीच महिने पुरेल एवढा अन्नधान्याचा साठा जमा झाला आहे. या मदतीत केवळ मुंबईच नव्हे तर पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार राज्यातील सीमेवर तैनात सैनिकांनीदेखील योगदान दिले. यामध्ये वैभव कदम, डॉ. केशव राजपुरे, वंदना मांढरे, सैनिक अतुल गायकवाड यांच्यासह अनेकांनी मदत केली आहे. 

जमा झालेल्या या मदतीमुळे सामाजिक कार्यरत या समूहाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नसून या माध्यमातून संवेदनशील विचारांचे लोक जर एकत्र आले तर समाजहित, समाजकल्याण, समाजपरिवर्तनाचे काम सहज करता येते, हे या "माय मराठी' समूहाच्या व्हॉट्‌सऍप समूहाने दाखवून दिले आहे. 


"" "माय मराठी समूह' हा संवेदनशील, सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या लोकांचा समूह आहे. आपल्या देशावर, समाजावर प्रेम करणारा हा समूह असून, हा एक परिवार आहे.'' 

-वैभव कदम, कार्यकर्ते, बावधन 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: विधान परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा गेमप्लॅन! किती जागा लढणार? आक्रमक रणनीतीनं विरोधक चिंतेत, समीकरण काय?

Solapur Water : 4.5 कोटींच्या थकबाकीने भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ठप्प; 39 गावांचा उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

MI vs CSK Live : रोहित शर्मा, MS Dhoni ला खेळताना पाहण्याची इच्छापूर्ती नाहीच... मुंबईने टॉस जिंकला, चेन्नईच्या ताफ्यात दोन बदल

मुमताज यांनी हिंदू मुलासोबत लग्न करायला होकार का दिला? इतक्या वर्षांनी कारण सांगत म्हणाल्या, 'आमच्या कुटुंबात...'

Iran-US War: मोटरबोटवरून पाठलाग, मास्क घालून जहाजावर चढले अन्...; इराणने होर्मुझमध्ये भारतीय जहाज कसे पकडले? पाहा थरारक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT