सातारा

साता-यातील सैनिकाच्या मृत्यूप्रकरणी पुण्यात खुनाचा गुन्हा दाखल

प्रवीण जाधव

सातारा : सैदापूर (ता. सातारा) येथे मारहाणीत जखमी झालेल्या सैनिकाचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींवर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
संदीप जयसिंग पवार (वय 39, रा. सैदापूर, पो. कोंडवे, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी चेतना पवार यांनी फिर्याद दिली आहे. संदीप हे सैनिक असून, सध्या ते सुटीवर आले होते. रविवारी (ता. 27) संदीप यांना मारहाण झाली होती. बेदम मारहाण झाल्याने ते जखमी अवस्थेत पडले होते. गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

नाशिक-बेळगाव विमानसेवा 25 जानेवारीपासून;काेल्हापूर-गाेव्याचा प्रवास तीन तासांचा

शवविच्छेदन अहवालामध्ये त्यांना गंभीर दुखापत असल्याचे समोर आले. त्यानुसार वानवडी (जि. पुणे) पोलिस ठाण्यात तसा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा तपासासाठी तालुका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तालुका व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अलर्ट झाले आहेत.

फास्टॅगच्या बंधनावर तासवडे, आनेवाडीत उसळणार विराेधाची लाट? 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satellite Toll System : नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा झटका, सॅटेलाईट टोल टॅक्स कलेक्शन प्रोजेक्ट स्थगित; नेमकं कारण काय?

Property Law: आई असेपर्यंत आजोबांच्या मिळकतीत हिस्सा नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निकाल

Latest Marathi News Live Update : संभाजीनगर: मतमोजणीवर सुनावणी आणि निकालाची तारीख निश्चित

लेकाच्या संगीत सोहळ्याला आदेश भाऊजींचा त्यांच्या होममिनिस्टरबरोबर धमाल डान्स

Niphad Cold Wave : 'निफाड म्हणजे थंडीची राजधानी'! बशीसारखी भौगोलिक रचना आणि नद्यांमुळे तापमान ६ अंशांपर्यंत घसरले

SCROLL FOR NEXT