Satara Latest Marathi News 
सातारा

छत्तीसगडच्या राष्ट्रीय स्पर्धेत माणच्या भावा-बहिणीची 'सुवर्ण' कामगिरी

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : अनेक खेळांमध्ये बहीण-भाऊ, भावाभावांच्या, बहिणी-बहिणींच्या जोड्या आपण पाहतो. अशीच बहीण-भावाची जोडी सध्या माणदेशामध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. माणदेशी चॅम्पियनमध्ये नियमित सराव करीत असलेली वैष्णवी सावंत आणि निशांत सावंत ही पुळकोटी येथील बहीण-भावाची जोडी सध्या अनेक मैदानी स्पर्धा गाजवत आहेत. 

रायपूर (छत्तीसगड) येथे नुकत्याच स्वामी विवेकानंद स्टेडियमवर झालेल्या 32 व्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत माणदेशी चॅम्पियनचे खेळाडू वैष्णवी विलास सावंत व निशांत विलास सावंत या बहीण- भावाच्या जोडीने पंधराशे मीटर धावण्यात अनुक्रमे सुवर्णपदक आणि रौप्यपदक मिळवत यश संपादन केले आहे. त्यांना माणदेशी चॅम्पियनचे संचालक ओंकार गोंजारी, प्रशिक्षक श्रीराम बाबर, लोखंडे सर, बानू वीरकर, सविता देशमुख व विलास सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्यांचे माणदेशी फाउंडेशनच्या सर्वेसर्वा चेतना सिन्हा, विजय सिन्हा, माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT