ST bus sakal
सातारा

सातारा : ST च्या नूतनीकरणासाठीची धावाधाव आता थांबणार

राज्यभरातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीकडे पाहिले जाते

सकाळ वृत्तसेवा

सातारा : एसटी बसच्या परवान्याचे नूतनीकरण राज्यातील सर्वच प्रादेशिक परिवहन कार्यालयांत होणार आहे. त्यामुळे राज्यभरात एसटी बसची धावपळ कमी होणार असून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी योग्य प्रमाणपत्र नूतनीकरणाची सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

राज्यभरातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून लालपरीकडे पाहिले जाते. याच एसटी बसचे नूतनीकरण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागत होता. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रवाशांना सेवा पुरविताना एसटी प्रशासनाला कसरत करावी लागत होती. याबाबत महामंडळाने राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांत एसटी गाड्यांचे पासिंग करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता परिवहन विभागाने त्या-त्या जिल्ह्यात एसटी पासिंग करण्याची परवानगी दिली आहे.

दरम्यान, राज्यात पुणे, नागपूर व औरंगाबाद या ठिकाणी एसटी बसच्या मध्यवर्ती कार्यशाळेत नवीन बसची बांधणी केली जाते. त्याच ठिकाणी स्थानिक आरटीओ कार्यालयात पासिंग करून राज्यभरातील विविध डेपोत बस संचलनासाठी पाठविण्यात येतात. त्यानंतर एसटी बसचे नूतनीकरण करण्यासाठी प्रथम ज्या आरटीओ कार्यालयात पासिंग झाले आहे, त्या ठिकाणी मोटार वाहन कर, पर्यावरण कर, विमा अद्ययावत करावे लागते. या कामासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते. आता नवीन नियमानुसार कुठल्याही आरटीओ कार्यालयात पासिंग करताना ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करता एसटी बस परिवहन कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT