Satara 
सातारा

कोयनातील बहुउद्देशीय प्रकल्प पावसाळ्यानंतर सुरू करा : शंभूराज देसाई

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना पर्यटन विकास आराखडा व राज्य शासनाच्या माध्यमातून कोयनानगर येथे ऊर्जा उद्यान पार्क, वॉटर पार्क व निसर्ग उपचार केंद्र उभारणीला मान्यता देण्यात आली आहे. कोयना पर्यटनाचा चेहरामोहरा बदलणारे हे बहुउद्देशीय प्रकल्प आहेत. पावसाळा संपल्यानंतर ही कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. 

पाटण येथील विश्रामगृहात कोयना पर्यटन विकास आराखडा आढावा बैठकीत श्री. देसाई बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महादेव मोहिते, सुरेश साळुंखे, कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अधिकारी कुमार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सरपंच शैलेंद्र शेलार आदी उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, ""आपण पुढाकार घेऊन कोयना पर्यटनाच्या विकासासाठी कोयना पर्यटन विकास आराखडा तयार केला आहे. राज्य शासनाने या विकास आराखड्याला 18 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. त्यातील अडीच कोटी रुपयांचा निधी सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलेला आहे. कोयना परिसरातील नवीन पर्यटन ठिकाणे विकसित करण्यात येणार आहेत. त्यात ओझर्डे धबधबा सुशोभीकरण, रामघळ, जंगली जयगड, घाटमाथा ते तोरणे वॉकिंग ट्रॅक या गोष्टींचा समावेश आहे. शासनाने कोयना परिसरात नव्याने ऊर्जा उद्यान, वॉटर पार्क व निसर्ग उपचार केंद्र उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. हे तिन्ही प्रकल्प बहुउद्देशीय आहेत. यामुळे कोयना पर्यटनाच्या लैकिकात भर पडून अल्पावधीतच पर्यटकांसाठी कोयना हे वर्ल्ड डेस्टिनेशन असणारे ठिकाण म्हणून ओळखले जाणार आहे.'' 


आयुर्वेदिक व्हिलेज उभारण्याचा मानस 

कोयना पर्यटन विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात कोयनेचे जंगल हे बहुगुणी औषधांचा ठेवा आहे. आयुर्वेदात जी जी काही वनाऔषधी आहेत, 
ती सर्व या जंगलात उपलब्ध असून, यामुळे वर्ल्ड हेरिटेज या जंगलामध्ये आयुर्वेदिक व्हिलेज उभारण्याचा मानस श्री. देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT