सातारा

निवडणुका पुढे गेल्याने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रशासक आणायचे कोठून?

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : राज्यात डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात या कालावधीत 881 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यातही अवघ्या दोन महिन्यांत ऑगस्टमध्ये त्यातील सुमारे साडेसातशे ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाकडे विस्तार अधिकारी अथवा ग्रामसेवकांची संख्याही अपुरी आहे. मोठ्या संख्येने प्रशासक नेमायचे असल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कोणाची वर्णी लावायची, याबाबत शासनापुढेही पेच निर्माण होणार असून, गावकारभाऱ्यांत त्याबाबत संभ्रमावस्था आहे.
 
कोरोनामुळे सध्या सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. जून ते डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात 881 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत आदींचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू केले होते. मात्र, कोरोनाचे संकट आल्यावर या प्रक्रियेला स्थगिती मिळाली. मुदत संपणाऱ्या ग्रापंचायतींनाही नेमकी मुदतवाढ मिळणार, की प्रशासक नेमणार? याबाबत उत्सुकता होती. त्यातच ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळात त्याला मंजुरीही मिळाली आहे. त्यामुळे या निर्णयाचा विचार करता येत्या ऑगस्टमध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 750 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यासाठी ते आणायचे कोठून? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ग्रामसेवकालाही प्रशासक नेमता येत नसल्याचे समजते. त्यासाठी विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी असणे आवश्‍यक असल्याचे समजते. त्यामुळे ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने ग्रामसेवकाला नियुक्त करायचे झाल्यास अनेक तालुक्‍यांत एका ग्रामसेवकाकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कार्यभार असल्याने त्यांची अगोदरच तारेवरची कसरत होते. त्यातच प्रशासकपदी नियुक्ती केल्यास जोखमीचे काम बनणार आहे. त्यामुळे राज्य शासन प्रशासकपदी नेमके कोणाला नियुक्त करणार, याबाबत पदाधिकाऱ्यांत संभ्रम आहे. 

ग्रामपंचायतींची मुदत संपल्यानंतर प्रशासकांकडे ग्रामपंचायतींचा कारभार येणार आहे. त्यात ग्रामविकास विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे प्रशासक नियुक्त करायचे झाल्यास काय निर्णय होणार, याकडे लक्ष आहे. मात्र, शासनाकडून कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची चर्चा आहे. त्याबाबत धोरणात्मक निर्णय होऊन प्रशासक नियुक्त केले जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

...अखेर ही पालिका झाली कोरोनामुक्त, नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT