Satara 
सातारा

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी रक्त लिखित मागण्यांचे निवेदन

अश्‍पाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : तालुका धनगर ऐक्‍य अभियानाच्या वतीने खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजासाठी एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे रक्तलिखित निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. तालुक्‍यात रक्ताने लिहिलेले मागण्यांचे निवेदन प्रथमच देण्यात आल्याचे यावेळी बोलले जात होते. 

यावेळी माजी सभापती रमेश धायगुडे, बाळासाहेब धायगुडे, बाळासाहेब शेळके, ऍड. सचिन धायगुडे, हितेश धायगुडे, दादा शेळके, हणमंत धायगुडे, गौरव धायगुडे, जिजाबा काळे व विठ्ठल धायगुडे उपस्थित होते. हे निवेदन नायब तहसीलदार वैभव पवार यांनी स्वीकारले. धनगर ऐक्‍य अभियानाचे कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर माजी सभापती धायगुडे यांनी रक्त देऊन हे निवेदन लिहिले.

या निवेदनात धनगर समाजाची एसटी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी, धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी त्वरित करावी व त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद त्वरित करावी, सध्या मेंढपाळांवर अनेक हल्ले होत असून, हे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आदी मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. या मागण्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करून त्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा धनगर समाज महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT