Satara Latest Marathi News 
सातारा

Success Story : कर हर मैदान फ़तेह! हिना इनामदारची भारतीय सैन्य दलात जिगरबाज भरारी

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : बेलमाची (ता. वाई) येथील हिना उस्मान इनामदार या युवतीने स्वतःच्या ताकद व जिद्दीच्या बळावर भारतीय सैन्य दलात दाखल होण्याचा मान मिळवला आहे. आसाम रायफलमध्ये ती भरती झाली आहे. 

बेलमाची येथील उस्मान इनामदार आणि आई हलिमा यांची हीना ही मुलगी. या दांपत्याला दोन मुले, एक मुलगी. बेलमाचीतील अनेक जण सैन्यात. त्यामुळे हिनाने ही सैन्यात दाखल होण्याची जिद्द बाळगली. सौमय्या महाविद्यालयात एनसीसीतून तिने 2015 मध्ये जम्मू काश्‍मीरमधील माउंटेनिअरिंग कॅंप, तसेच 2016 ला स्कुबा डायव्हिंग कॅंप पूर्ण केला. 2017 मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त दिल्ली होणाऱ्या राष्ट्रीय परेडसाठी तिची एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाली होती. 

2018 मध्ये तिची पोलिस दलात निवड झाली होती. मात्र, तिने सैन्य भरतीसाठी प्रयत्न केले. 2018 मध्ये झालेल्या आर्मीच्या स्टाफ सिलेक्‍शनच्या परीक्षेतून तिला यश मिळाले. भारतमातेच्या सेवेसाठी घरच्यांचा पाठिंबा होता. मला त्यांनी इथपर्यंत पोचण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. यापुढे मला पॅरा कंमाडोसाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया हिनाने भरती झाल्यानंतर दिली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT