सातारा

पिता - पुत्रांच्या कष्टाने फुलला नापिक शिवार...

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : ही वस्तूस्थिती आहे, दुशेरे (ता. कऱ्हाड) येथील सुभाष पांडूरंग जाधव व त्यांचा मुलगा प्रशांत कष्टाने बहरवलेल्या वनराईची. तीन वर्षांपूर्वी त्यांनी नापिक असणाऱ्या 11 गुंठ्यांतील बाभळी काढून त्यात फळबाग लागवड केली. आजमितीस त्या जमिनीचे रुपच पालटून गेले आहे. नापिक जमिनीचे फळबागेत झालेले रूपांतर पाहून अन्य शेतकऱ्यांना जाधव पिता- पुत्रांची धडपड प्रेरणादायी ठरत आहे. 
श्री. जाधव व मुलगा प्रशांत यांनी 2017 मध्ये नदीलगत उताराची जमीन हाताखाली आणण्याचा विचार केला. त्यावेळेस वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या बाभळी काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्या त्यांनी लाकूड वखार व्यावसायिकास काढून दिल्या. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात व कृषी सहाय्यक एम. आय. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व शिफारशीनुसार खड्डे घेऊन त्यात खत भरणी केली. काशीळ येथील शासकीय रोपवाटिका व उपलब्ध ठिकाणाहून फळझाडे आणली.

रोपे लावणीनंतर संपूर्ण शेतीला तारेचे कुंपण घेतले. सुरवातीचे सहा महिने रोपांना बादलीने पाणी दिले. त्यानंतर सर्व रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी सुरू केले. रोपे, कुंपण व ठिबक सिंचनासाठी 30 हजार रुपये खर्च केले. त्या दोघांच्या परिश्रमातून तेथे नारळ, आंबा, शेवगा, चिकू, डाळिंब, लिंबू, सिताफळ, पेरू, आवळा, देशी केळी, रामफळ, कडीपत्ता, जांभूळ आदींची फळबाग बहरली आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या या जमिनीत बहरलेली फळबाग आदर्शवत ठरत आहे.

सुरुवातीस शेवगा, नारळातील आंतरपीक देशी केळीचे दहा ते बारा हजाराचे उत्पन्न मिळाले. आजमितीला केळी, पेरू, सिताफळ व शेवग्याचे उत्पन्न मिळत आहे. सुभाष जाधव व प्रशांत यांच्या कष्टाला श्री. जाधव यांचे मोठे चिरंजीव नितीन यांची साथ मिळत आहे. गेल्यावर्षी महापुरात आंबा, नारळ व शेवग्याच्या झाडांची हानी झाली. शासनदप्तरी फळबागेची नोंद असूनही ते नुकसान भरपाईपासून अद्याप वंचित राहिले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT