सातारा

खून, दरोड्यातील सातजण तडीपार; उंब्रजात सातारच्या एसपींची मोठी कारवाई

उमेश बांबरे

सातारा : उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या दोन टोळ्यांतील सात जणांना साताऱ्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी आज तडीपार केले आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे दहशत पसरविणा-या व समाजात बेकायदेशीर कारवाया करणाऱ्या टोळ्यांविरूध्द तडीपारची कारवाई सुरुच राहणार असल्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे. 

उंब्रज व पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, मोठी दुखापत, दरोडा, गर्दी मारामारी करणारे टोळीचा प्रमुख संदीप भानुदास भिंताडे (वय २५, रा. जाळगेवाडी, ता. पाटण), सागर उर्फ बंडा शंकर गायकवाड (वय २७, रा. उंब्रज, ता. कराड), सोन्या उर्फ शाहिद शब्बीर मुल्ला (वय २२, रा. उंब्रज), रोशन उर्फ रोशा अरविंद सोनावले (वय २१, रा. उंब्रज) यांची टोळी तयार झाली होती. या टोळीने अनेक गुन्हे केल्याने यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांचे कारमाने सुरूच होते. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांना सहा महिने सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले होते. पण हद्दपारीचा कालावधी संपताच त्यांनी पुन्हा दोन गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत, भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या टोळीतील चार जणांना सातारा तसेच सांगली जिल्ह्यातील कडेगांव, वाळवा,  शिराळा तालुक्यातुन एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते. 

तसेच उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, खंडणी, विनयभंग, दुखापत मारामारी, शिवीगाळ, दमदाटी करणाऱ्या टोळीचा प्रमुख रणजित नथुराम सरगर (वय २३, रा. वाघेश्वर, ता. कराड) अक्षयउर्फ आप्पा अंकुश लोखंडे (वय २४, रा. संजयनगर मसुर, ता. कराड), धीरज रघुनाथ जाधव (वय ३०), रा. वाघेश्वर, मसुर, ता. कराड) यांना सुधारण्याची संधी देऊन तसेच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. सर्वसामान्य जनतेस त्यांचा उपद्रव  सुरूच होता. या दोन टोळीतील सर्वांनाच हद्दपार करण्याबाबत जनतेमधून मागणी होत होती. प्रस्तावित दोन्ही टोळीमधील सात जणांना हद्दपार करावे, अशी मागणी उंब्रज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. त्यावर चौकशी व सुनावणी होऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण पोलिस अधीक्षकांनी या दोन टोळ्यातील सात जणांना तडीपार केले आहे. या सुनावणीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक पोलिस फौजदार मधुकर गुरव यांनी पुरावे सादर केले होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT