Satara 
सातारा

वाई तालुक्‍याच्या हद्दीत भुयारीमार्ग बनलेत "स्विमिंग टॅंक'!

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर असलेल्या गावानजीक महामार्ग ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी भुयारीमार्ग बांधण्यात आले आहेत. मात्र, ते बांधताना सखल भागांची परिस्थिती न पाहता बांधल्याने पावसाळ्यात तेथे पाणी साठून "स्विमिंग टॅंक' तयार होत आहेत. परिणामी तेथील महिला व नागरिकांना अक्षरक्षः घाण पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. तर दरवर्षी येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठून हे भुयारी मार्ग पाण्याखाली जात असल्याने त्या गावांतील नागरिकांचा रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे. 

वाई तालुक्‍याच्या हद्दीतील वेळे, कवठे, अनवडी, बदेवाडी आणि आनेवाडी येथे असे भुयारी मार्ग आहेत. सहापदरीकरणात लोकांना महामार्ग ओलांडता यावा, यासाठी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. यापैकी काही ठिकाणी त्याची आवश्‍यकता नसल्याची बाब समोर ठेवून महामार्ग प्राधिकरणाने काम दामटले. मात्र, त्या ठिकाणी अपघातांची संख्या वाढून अनेकजण जायबंदी तर काहींनी मृत्यू पत्करावा लागल्याने जनप्रक्षोभ उसळून लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव भुयारी मार्गांची निर्मिती करण्यात आली.

मात्र, ती करताना महामार्गावरील रस्त्याचा उतार किंवा पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होईल, या परिस्थितीचे कोणतेही सोपस्कार न पाहता ही कामे उरकण्यात आली आहेत. परिणामी या चुकीच्या बांधकामांमुळे सखल भाग निर्माण होऊन पाणी साठत आहे. याबाबत स्थायिक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही यात कसलीही डागडुजी, दुरुस्ती होताना दिसत नाही. दररोज हजारो गावकऱ्यांना या घाण पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. तेथून चुकून एखाद्या खड्ड्यात महिला किंवा एखादा दुचाकीस्वार पडला तर बुडून अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्रास 

भुयारी मार्गांत साचलेल्या पाण्याचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासातून या परिसरातील नागरिकांची आणि या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची या "स्विमिंग टॅंक'च्या कचाट्यातून सुटका करावी, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT