Satara 
सातारा

मोफत फळरोपे घेऊन जा आणि लावून फळे चाखा!, अधिक माहितीसाठी वाचा

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : खुश खबर... खुश खबर...मोफत फळरोपे घेऊन जा...आणि आपले शेत, बांध, घराजवळ, परसदार कोठेही लावा आणि फळे चाखा, अशी छान योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे तुम्ही 2017 नंतर जन्मलेल्या मुलीचे पालक हवे आहात. 

दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेली वनसंपदा व मुलींचा घटणारा जन्मदर हा समस्त समाजाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. सामाजिक वनीकरण विभागाने हे दोन्ही प्रश्‍न डोळ्यासमोर ठेवून "कन्या वन समृद्धी योजना' सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबात 2017 नंतर मुलीचा जन्म झालेला असेल, त्या कुटुंबाला विविध प्रकारची दहा फळरोपे मोफत दिली जातात. मुलींचा जन्मदर वाढावा, गावाच्या परिसरामध्ये वनसंपदा वाढावी, सर्व नागरिकांमध्ये पर्यावरणप्रेम वाढावे, यासाठी ही योजना 2017 पासून सामाजिक वनीकरण विभागामार्फत आणि गावच्या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. 

सोनगाव तर्फ सातारा येथे 2017 पासून 48 मुलींचा जन्म झाला आहे. त्या मुलींच्या पालकांना नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आणि सोनगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येकी दहा फळरोपांचे वाटप करण्यात आले. या वेळी वनीकरण विभागाच्या वतीने वनरक्षक डी. ए. कदम यांनी कन्या वनसमृद्धी योजनेची माहिती सविस्तर दिली. या वेळी सरपंच पांडुरंग नावडकर, आशा स्वयंसेविका हेमलता नावडकर, मीना देशमुख, वन विभागाचे डी. ए. कदम, वनरक्षक एस. बी. खामकर, एस. एम. जाधव, ग्रामस्थ रामचंद्र नावडकर, सुनील नावडकर, शिवराम नावडकर, अमोल नावडकर उपस्थित होते. 

सामाजिक वनीकरण कार्यालयात संपर्क करा 

कन्या वनसमृध्दी योजनेचा लाभ घेण्यासाठी 2017 नंतर मुलीला जन्म दिलेल्या पालकांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या आपापल्या तालुका कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सातारा विभागीय वन अधिकारी धर्मवीर सालविठ्ठल यांनी केले आहे. 


संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT