सातारा

शिष्यवृत्तीत सातारा तालुका जिल्ह्यात अव्वल

प्रशांत घाडगे

सातारा : नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा निकालात सातारा तालुक्‍याने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. इयत्ता पाचवी अन्‌ आठवी इयत्तांत मिळून 175 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारकांचा विचार करता राज्यातही ही संख्या मोठी मानली जात आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात एकूण 11 तालुक्‍यांत सातारा तालुक्‍यातील विद्यार्थी सर्वांत जास्त संख्येने चमकले आहेत. इयत्ता पाचवीच्या विभागात एकूण 77 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान पटकावला. इयत्ता आठवीच्या विभागात एकूण 98 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. दोन्ही विभागांत मिळून एकूण 175 विद्यार्थी यशस्वी झाले. तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली. इयत्ता पाचवीच्या विभागात अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे सर्वांत जास्त म्हणजे 11 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. त्यापाठोपाठ न्यू इंग्लिश स्कूल (दहा), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (आठ), महाराजा सयाजीराव विद्यालय (सहा), रा. ब. काळे विद्यालय (पाच) या शाळांनी भरीव यश पटकविले. 

इयत्ता आठवीच्या विभागात अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (21), न्यू इंग्लिश स्कूल (14), महाराजा सयाजीराव विद्यालय (दहा), गुरुकुल विद्यालय (दहा), छत्रपती शिवाजी विद्यालय, अपशिंगे मिलिटरी (सहा) या शाळांनी पहिल्या पाच क्रमांकात स्थान पटकावले. सातारा तालुक्‍यापाठोपाठ खटाव अन्‌ कऱ्हाड तालुक्‍याने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थी अन्‌ त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे पंचायत समितीचे सभापती सरिता इंदलकर, उपसभापती अरविंद जाधव, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण तसेच सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. दरम्यान, खटाव तालुक्‍यातील इयत्ता पाचवीचे 68, तर इयत्ता आठवीचे 88 असे मिळून एकूण 156 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. कऱ्हाड तालुक्‍यातील इयत्ता पाचवीचे 84, तर इयत्ता आठवीचे 59 असे मिळून एकूण 143 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. 

विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट, शिक्षक अन्‌ पालकांची मेहनत, अधिकारीवर्गाचे मार्गदर्शन यामुळे यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात सातारा तालुक्‍याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. हे यश तालुक्‍याच्या शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारे आहे. 
-संजय धुमाळ, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सातारा  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT