loss of property
loss of property system
सातारा

Tauktae Live कऱ्हाड, पाटणला घरांची पडझड; महावितरणलाही फटका

रवीकांत बेलोशे, राजेश पाटील, सचिन शिंदे, हेमंत पवार

सातारा : सातारा जिल्ह्यातील सातारा शहारात रविवार दुपारी चार वाजल्या पासून (ता. 16) आज (साेमवार) सकाळपर्यंत पावसाची (rain) संततधार सुरु आहे. ताैक्ते वादळाचा फटका (tauktae cyclone) जिल्ह्यातील पाचगणी, पाटण या ठिकाणी झाडांची पडझड, घरांची पडझड झालेली आहे. (satara tauktae cyclone effect panchgani karad patan marathi news)

पाचगणी आणि परिसरात वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. बरीच झाडे ही वीज वितरणच्या तारा, पोल, ट्रान्स्फॉर्मरवर पडल्याने वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पाचगणी मुख्य रस्त्यावर शॉपिंग सेंटरमधील एक सिल्व्हर मुख्य रस्त्यावर कोसळल्याने रस्त्याचे कडेला असणाऱ्या भारत पुरोहित यांच्या पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले.

रविवारी दुपारपासूनच जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. वारे इतके जोरदार आहे की, मोठमोठे निलगीर, सिल्व्हरची झाडे जणू जमिनीशी स्पर्धा करीत आहेत. घराशेजारी असणाऱ्या या झाडांमुळे बरेच लोक जीव मुठीत ठेवून बसले आहेत.

पाचगणी येथील मुख्य रस्ता व शेजारीच असणाऱ्या एका ट्रान्स्फॉर्मरवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे पडल्याने तारा तुटल्या आहेत. काही पोल पडले आहेत. त्यामुळे सर्वजण अंधारात आहेत.

राजपुरी येथील विलास शंकर राजपुरे यांच्या घराचे छप्पर उडून गेले. दापवडी येथील सतीश वन्ने यांच्या घरावरील पत्रा उडून गेला. काटवली येथील सुमन रांजणे यांच्या घरावरील पत्रा उडून गेला आहे. सर्वत्र वीज नसल्याने अंधार झाला आहे.

निगड्यात वादळाने उडाले घराचे छप्पर

ढेबेवाडी : वादळी पावसाने निगडे (ता. पाटण) येथील घराचे छप्पर उडाल्याने मोठे नुकसान झाले. रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची माहिती अशी, निगडे येथील महादेव बाळकू तेटमे व त्यांचे बंधू राहण्यास असलेल्या घराला आज सायंकाळी वादळी पावसाचा तडाखा बसला. छप्पर वादळात उडाल्याने घरातील लोकांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

श्री. तेटमे यांचा मंडप व लाऊडस्पीकरचा व्यवसाय आहे. घराचे छप्पर उडाल्याने आत ठेवलेले धान्य तसेच प्रापंचिक व व्यावसायिक साहित्य भिजून नुकसान झाले. उघडीप मिळून घर दुरुस्ती होईपर्यंत तेटमे कुटुंबीयांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या जनावरांच्या शेडला पवनचक्कीच्या वीज वाहिन्यांमुळे आग लागून जनावरे भाजली होती. संबंधितांकडून त्याची भरपाई मिळाली नसताना आज घडलेल्या नुकसानीच्या दुसऱ्या घटनेमुळे या कुटुंबाला धक्का बसला आहे.

कऱ्हाड, पाटणला घरांची पडझड

कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांतील विविध भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्‍यातील काही भागातील घरांची पडझड झाली आहे. त्यांचे पंचनामे सुरू आहेत. तालुक्‍यातील अनेक भागात शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळेही नुकसान झाले. वादळी वाऱ्याने येथील उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर झाडाची फांदी कोसळली. सुदैवाने त्यात फारशी हानी झाली नाही. मात्र, लसीकरणात व्यत्यय आला. नंतर लसीकरण एका इमारतीत सुरू केले.

कऱ्हाड शहरासह तालुक्‍याच्या विविध भागात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी अकरानंतर पावसास सुरवात झाली. दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस येत होता. वादळी वाऱ्याने येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर झाडाची फांदी कोसळली. फांदी कोसळताना आवाज झाला. त्यामुळे तेथे धावाधाव झाली. लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारासह शेडवर फांदी कोसळली. प्रवेशव्दारासमोरील बॅरिकेट्‌सचे नुकसान झाले. पहिली लस घेणाऱ्यांनी 30 तर दुसरी लस घेणाऱ्यांना 110 लशी उपलब्ध झाल्या होत्या. केंद्रावर फांदी कोसळल्याने काही काळ व्यत्यय आला. पालिका कर्मचाऱ्यांनी फांदी बाजूला केली. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या शेडमध्ये लसीकरण हलविण्यात आले. तेथे बसण्याची सोय केली होती. रात्री झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडल्याने शहरातील काही भागातील वीज पुरवठा सारखा खंडित होत होता. काही भागातील घरांची पडझड झाली आहे, त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे, असे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी सांगितले.

चक्रीवादळामुळे वेगाने वाहणारे वारे अन्‌ कमी-अधिक प्रमाणात पडणारा पाऊस असे वातावरण येथे निर्माण झाले होते. पावसाने शेतात पाणी साचून राहिल्याने कामे ठप्प झाली होती. वादळी वारे जोरात वाहत होते. घरांचे व सार्वजनिक इमारतींचे कोणतेही नुकसान झालेले नाही, अशी माहिती तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी दिली. सकाळपासून पुन्हा वारे जोरात वाहू लागले. दुपारी 12 वाजता रिमझिम पावसास सुरुवात झाली. शनिवारी दुपारी सुरक्षितता म्हणून घरी आलेले शेतकरी आज दिवसभर घरीच बसून राहिले. वादळी वाऱ्यामुळे घरांचे अथवा सार्वजनिक इमारतींचे कोणतेही नुकसान झालेले नाही. तलाठी व मंडलाधिकारी लक्ष ठेवून आहेत. जोरदार वारा वाहत असूनही कोणतीही दुर्घटना घडलेली नाही ही तालुकावासीयांसाठी समाधानाची बाब आहे, असे तहसीलदार टोंपे यांनी सांगितले.

कऱ्हाड तालुक्‍यातील विविध गावांत पावसाने नुकसान झाल्याचे समजते आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी लोकांना पाठवून पंचनामे करत आहोत. काही घरांची पडझड झाली आहे अशी माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT