सातारा : कृष्णा कालव्याला झाडेवेलींचा विळखा; वाहत्या पाण्याला मोठा अडथळा sakal
सातारा

सातारा : कृष्णा कालव्याला झाडेवेलींचा विळखा; वाहत्या पाण्याला मोठा अडथळा

- अमोल जाधव

सातारा : कृष्णा कालव्याला झाडेवेलींचा विळखा; वाहत्या पाण्याला मोठा अडथळा

रेठरे बुद्रुक : सातारा व सांगली जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतीला जीवनदायिनी ठरणाऱ्या कृष्णा कालव्यातील पाण्याला झाडवेलींचा मोठा अडथळा होऊ लागला आहे. पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात झाडवेली आल्याने प्रवाहाची गती कमी होत आहे. पाण्यामधील झाडवेलींचा विळखा काढल्यास ही समस्या सुटू शकते, याकरिता कृष्णा कालवा विभागाने उपाययोजना आखण्याची गरज आहे.

खोडशी येथील कृष्णा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातून ब्रिटिशकालीन कृष्णा कालवा प्रवाहित होतो. तो कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातून वाहतो. कालव्यातील पाण्याच्या आधारावर चार तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांची प्रगती झाली आहे. कालवा बारमाही वाहता राहावा, याकरिता शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत; परंतु हंगामनिहाय पिकांना कालव्यातून पाणी उपलब्ध होत असल्याने पीक पद्धती राबवताना शेतकऱ्यांना अडचणी राहात नाहीत. कालवा शेतीसाठी जीवनदायी असला, तरी कालवा व्यवस्थापनामध्ये कुचराई केली जात आहे. पाणीवाटप, वितरण व देखभाल या बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात विस्कळितपणा पाहायला मिळत आहे.

कालव्यास अनेक ठिकाणी डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. तोच सध्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा ठरणाऱ्या झाडवेली बाजूला करण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रवाहात झाडवेलींचा विळखा असल्याने प्रवाह कमी गतीने वाहत आहे. दरम्यान, कालव्यालगत दोन्ही बाजूस स्वच्छता न झाल्याने धोकादायक स्थिती बनली आहे. कृष्णा कालवा विभागाने याकामी प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Shortage in India : पुढील 3 महिने गॅस सिलिंडर मिळणं कठीण? छगन भुजबळ यांनी दिला धोक्याचा इशारा, पाहा काय आहे कारण?

Land Scheme: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! गरीबांसाठी घराचा मार्ग मोकळा; महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क, जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

इराणला नवा साथिदार! अमेरिकेला धुडकावून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा; मध्यपूर्वेत युद्धाचा भडका, युद्ध आणखी तीव्र होणार?

एकतर्फी प्रेमातून आधी पाठलाग, नंतर रस्त्यात गाठलं अन्...; तरुणानं तरुणीसोबत नको ते केलं...

SCROLL FOR NEXT