file photo
file photo sakal
सातारा

सातारा : घरफोड्या करणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

दहिवडी : शहर व परिसरात सतत घरफोड्या व चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करून साडेसात लाखांचा ऐवज जप्त करण्यात व १५ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहर व परिसरात सतत घडणारे घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यातील संशयितांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार दहिवडी पोलिसांनी शहर व परिसरातील उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून व तांत्रिक माहितीच्या, तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताबाबत माहिती प्राप्त करून चोरट्यांपर्यंत पोचण्यात यश मिळवले.

घरफोडी चोरी करणाऱ्यांपैकी अजय ऊर्फ सोन्या राम गुजले (वय १८, मूळ रा. कवठे, ता. कऱ्हाड, हल्ली रा. गोंदवले रस्ता, चव्हाण वस्तीजवळ दहिवडी) यास प्रथम ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने, तसेच त्याचे साथीदार महेश ऊर्फ लखन पोपट भोसले (रा. जयराम स्वामीचे वडगाव ता. खटाव, हल्ली रा. गोंदवले रोड चव्हाण वस्तीजवळ दहिवडी), सचिन हणमंत माने (वय ३५, रा. गोंदवले बु. ता. माण), शेखर युवराज अवघडे (वय २०, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी, तसेच त्यांचे अन्य दोन साथीदार यांनी दहिवडी, म्हसवड शहर व परिसरात घरफोड्या, चोऱ्या केल्या असलेचे तपासांत सांगितले. या सर्वांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांना, तसेच चोरीचा माल घेणारा पंकज चंद्रकांत कट्टे (वय २९, रा. कवटवस्ती गोंदवले बुद्रुक, ता. माण) याला अटक केली.गुन्हा करण्यासाठी वापरलेली हत्यारे कुकरी, कोयता, चाकू, कटावणी, टॉमी व मोटारसायकल असा ७ लाख ५० हजाराचा माल हस्तगत केला. आरोपींनी १५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

ही कारवाई दहिवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलिस उपनिरीक्षक डी. डी. तुपे, पोलिस हवालदार एस. एन. केंगले व बी. एस. खांडेकर, पोलिस नाईक आर. एस. बनसोडे, पी. बी. कदम, आर. पी. खाडे व वाय. आर. मोरे, पोलिस कॉन्स्टेबल के. आर. बर्गे व ओ. के. पाटोळे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT