udyanraje bhonsle  sakal
सातारा

सातारा : त्यांची ओरड म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

वचननाम्यातील सर्व कामे मार्गी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा विकास आघाडीने मागील पंचवार्षिक निवडणुकीत वचननामा दिला होता. त्यामधील सर्व कामे मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. केलेल्या कामाचे जाहीर ऑडिट करणारी सातारा विकास आघाडी राज्यात एकमेव ठरली आहे, तरीही स्वतः बाळबोध असल्याचे समजून साविआ आणि आमच्यावर भ्रष्टाचार, कमिशन, टक्केवारी आदी आरोप होत आहेत. भ्रष्टाचारामध्ये आकंठ बुडालेल्या व्यक्तीने अशी ओरड करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळून केली आहे.

शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केलेल्या सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराबाबतच्या मुद्द्याबाबत दूध का दूध-पानी का पानी होण्यासाठी खासदार उदयनराजेंनी प्रसिद्धी पत्रकातून त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. उदयनराजेंनी म्हटले, की नागरिकांनी आम्हाला ज्या विश्‍वासाने भरभरून प्रेम दिले आहे. त्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता सातारा पालिकेचा कार्यकाल अतिशय संयमाने चालवण्यात आला.

फक्त साविआच्याच नगरसेवकांची नाही, तर सर्वच नगरसेवकांची कामे समयोचित प्रकारे मार्गी लावली. राज्याचे आणि केंद्राचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अमृत योजना, वित्त आयोग या सर्व केंद्राच्या योजना असून, त्यामधून भरघोस निधी प्राप्त करून घेण्यात आला आहे. सातारा विकास आघाडीच्या वचननाम्यातील कास धरण उंची वाढवणे, भुयारी गटार योजना, घनकचरा व्यवस्थापन, नवीन प्रशासकीय इमारत, ग्रेडसेपरेटर, आयुर्वेदिक गार्डन, शहरातील सर्व उद्यानांचे नूतनीकरण, ज्येष्ठ नागरिक भवन, घरकुल योजना, शहीद कर्नल संतोष महाडिक यांचे स्मारक, हद्दवाढ भागाकरिता सुरू करण्यात आलेली सहा नवीन नागरी आरोग्य केंद्रे हे मुख्य मुद्दे मार्गी लागले आहेत. पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे.’’

हे ज्यांचा वारसा सांगतात ते सर्व सत्ताधीश असतानाही त्यांनी कचरा उचलण्याच्या पद्धतीत सुधारणा केली नाही. आम्ही कुंडीमुक्त शहर ही संकल्पना राबविण्याकरिता घरोघरी घंटागाड्या सुरू केल्या, असेही त्यांनी नमूद केले आहे.

गांधी मैदानावर आमने- सामने या...

आम्ही यापूर्वीच त्यांना समोर येण्याचे आव्हान अनेकदा केले आहे; परंतु त्या वेळी नसलेली शेपूट घालून, कधीही आमचे आव्हान यांनी स्वीकारले नाही. आता नव्याने आव्हान देत आहेत. निधी किती आणला याबाबतचे त्यांचे आव्हान आम्ही नम्रपणे स्वीकारतो; परंतु त्याकरिता गांधी मैदान येथे आमने- सामने झाले पाहिजे. वेळ आणि तारीख दोघांच्या सोयीची असावी. आम्ही तयार आहोत. कर नाही त्याला डर कशाला, असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT