घरफोडी sakal
सातारा

कऱ्हाड : मालखेडला तीन ठिकाणी घरफोडी; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्या.

हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील नवीन मालखेड (ता. कऱ्हाड) येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या केल्या. त्यात एका कुटुंबाचे ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे दागीने चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.

पोलिसांची माहिती अशी : नवीन मालखेड येथील पूनम अजय ओव्हाळ यांनी तालुका पोलिसांत त्याबातची फिर्याद दिली आहे. त्यामध्ये त्यांचे नवीन मालखेडमधील समाज मंदीराजवळ घर आहे. काल रात्री त्यांचे पती नोकरीसाठी गेले. त्यानंतर त्या, त्यांची आजी सासू गंगूबाई, मुलगा उत्कर्ष, सासू रंजना या घरी झोपल्या होत्या.

मध्यरात्री तीनच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्याने पूनम ओव्हाळ यांना जाग आली. त्यावेळी दरवाजाजवळ त्यांना दोन चोरटे दिसल्याने त्यांनी सासूबाईना आवाज दिला. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर ओव्हाळ यांनी खात्री केली असता घरातील पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, शेजारच्या शहाबाई ओव्हाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरात चोरट्यांनी हात साफ केला. त्याचबरोबर अरुण ओव्हाळ यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavatmal Crime: मुलानेच आईच्या मदतीने केला वडिलांचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बंधाऱ्यात फेकला, यवतमाळ जिल्हा हादरला!

Latest Marathi News Live Update : एक्सप्रेसवे वर झालेल्या वाहतूक कोंडीचा एसटी विभागाला फटका

Rahul Gandhi : घाबरल्यामुळेच मोदींची संसदेकडे पाठ; जबाबदारीपासून पळ काढल्याचाही आरोप

Gadchiroli News: मार्कंडेश्वराचा जीर्णोद्धार दहा वर्षांपासून सुरूच; महाशिवरात्री यात्रा दोन आठवड्यांवर, अपूर्ण कामांबाबत भाविकांमध्ये नाराजी!

Kolhapur Heritage : ५० वर्षांचे वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर; ‘हेरिटेज ट्री’ फक्त कागदावरच!

SCROLL FOR NEXT