सातारा

सातारा जिल्ह्यावर काळ घोंघावतोय; एका संशयितासह तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

सातारा : एक कोरोना बाधीत वृद्धा व दोन संशयीत असा तिघांचा आज (रविवार) दिवसभरात मृत्यू झाला. मृतांमध्ये महाबळेश्‍वर येथील कोरोना केअर सेंटरमध्ये आत्महत्या केलेल्या संशयीताचा समावेश आहे. आज दोघे कोरोना मुक्त झाले असून 131 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. 

कोरोना संशयीत व बाधीतांच्या मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजही वाहगाव (ता. जावळी) येथील 70 वर्ष वयाच्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तीच्या मृत्यूमुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या 21 झाली आहे. वृध्द व आजार असलेल्या व्यक्तींसाठी कोरोनाचा संसर्ग घातक असल्याचे पुन्हा-पुन्हा समोर येत आहे. 

त्याचबरोबर दोन संशयीतांचाही आज मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुसेसावळी (ता. खटाव) येथील 48 वर्षीय महिलेचा तसेच तसेच महाबळेश्वर येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या झांजवड (ता. महाबळेश्‍वर) येथील पुरुषाचा समावेश आहे. त्याने आज विलगीकरण कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांच्या घशातील स्त्रावाचे नमुणे तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

दरम्यान, आज खावली येथील कोरोना केअर सेंटर मधील दोन कोरोना बाधीतांचे 14 दिवसानंतरचे नमुणे निगेटीव्ह आले. त्यामध्ये खटाव तालुक्‍यातील निमसोड येथील 20 वर्षीय युवक व 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्या दोघांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासात 131 जणांना जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयात 19, कृष्णा हॉस्पिटलमध्ये नऊ, वाई ग्रामीण रुग्णालयात 36, शिरवळ येथे 52, तर रायगाव कोरोना केअर सेंटरमध्ये 15 जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये दोन मृतांचाही समोवश आहे. आज सकाळपर्यंत 262 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT